विवाहाचे कपडे खरेदीस गेलेल्या नवरदेवाचा मेहरूण तलावात आढळला मृतदेह

0
जळगाव | प्रतिनिधी : लग्नाचे कपडे खरेदीसाठी जातो असे सांगून रविवारी सायंकाळी ४ वाजता घरातुन बाहेर पडलेला नवरदेव मुलाचा मृतदेह मेहरुण तलावात आज सकाळी आढळला.

दरम्यान मयत सलमानच्या अंगावरील कपडे, मोबाईल व ५ हजाराची रक्कम न मिळून  आल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासुन संशयीतांवर कारवाई करीत नाही. तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

*