नाशिक विभागीय कला उत्सव स्पर्धेत चोपड्याचे कस्तुरबा माध्यमिक विद्यालय प्रथम

0
चोपडा, | प्रतिनिधी  :  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने’ विभागीय कला महोत्सव’अंतर्गत दि. २३ रोजी नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत लोकनाट्य या कला प्रकारात चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या चार जिल्ह्यांमधून निवड झालेली कस्तुरबा माध्यमिक विद्यालय चोपडा हे पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय कला महोत्सव स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या मार्ङ्गत २०१५-१६ पासून कलाउत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

या कलाउत्सवात लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य (अभिनय),दृश्यकला (चित्रकला हस्तकला शिल्पकला) या कला प्रकारांचा समावेश करण्यात येतो जिल्हास्तरावरून निवड झालेला एक संघ विभागाचे प्रतिनिधित्व करतो विभागीय पातळीवरून चार संघ राज्य पातळीवर,तेथून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होतात.

लोकनाट्य या प्रकारात विद्यालयाने सरकार द्या उत्तर हा विषयावर ग्रामीण भागातील विजेची समस्या, न्यायालयाकडून उशिराने मिळणारा न्याय,शेतकरी आत्महत्या, शहीद जवानाच्या पत्नीची होणारी ङ्गरङ्गट,धर्माधर्मात होणारे वाद, हॉकी प्लेयरची व्यथा, ह्या विषयांवर सरकार पुढे प्रश्न मांडून.. द्या उत्तर असा सवाल करीत नाटिका सादर केली.

यात सपना साळुंखे,प्रतीक्षा धनगर,स्मृती भोई,वर्षा कोळी,महेश पाटील,जयेश महाजन,प्रवीण पाटील,रोहित सूर्यवंशी,लोकेश चौधरी,ऋषिकेश पाटील,या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ह्या विजयी स्पर्धकांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश जी पाटील,कार्यकारी अध्यक्ष ऍड संदीप पाटील,सचिव डॉ स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी देविदास महाजन,उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी कौतुक केले आहे.

त्यांना विद्यालयातील शिक्षक एन आर पाटील,शिक्षिका रुची शाह,मकरंद चौधरी, नितीन राजपूत ,मुख्याध्यापक आर डी साठे,एस व्ही पाटील,एस एल पाटील,मदन भोई यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*