सर्वोच्च न्यायालयाचे ‘जैसे-थे’चे आदेश

0

जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेवून दोन महिन्यात प्रक्रिया करावी, असा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला होता.

या निर्णयाविरोधात काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या.ए.के.सिकरा व न्या.अशोक भुषण यांच्या द्विपीठासमोर कामकाज झाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दि.4 डिसेंबरपर्यंत ‘जैसे थे’चे आदेश दिल्यामुळे गाळेधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली.

याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने दि.14 जुलै 2017 रोजी दोन महिन्यात गाळे ताब्यात घेवून मनपा प्रशासनाने पुढील प्रक्रिया करावी, असा निकाल दिला होता.

या निकालामुळे गाळेधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेवून याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर आज न्या.ए.के.सिकरा, न्या.अशोक भुषण यांच्या द्विपीठासमोर कामकाज झाले असता, गाळेधारकांना तात्पुरता दिलासा देत दि.4 डिसेंबरपर्यंत ‘जैसे थे’चे आदेश दिले.

पुढील सुनावणी दि.4 डिसेंबर रोजी होणार आहे. गाळेधारकांदरम्यान अ‍ॅड.हरीष साळवे तर मनपातर्फे अ‍ॅड.सुद यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*