पफर मासा आणि माणसातील दातांसंबंधीची जनुके सारखीच !

0
लंडन | वृत्तसंस्था :  कधी कधी जीवांच्या प्रजाती वेगळ्या वाटत असल्या तरी त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे साम्य असतेच. विशेष म्हणजे डुकरासारख्या प्राण्यातील अंतर्गत अवयव आणि मानवी अवयव यांच्यामध्येही कमालीचे साम्य असते.

त्यामुळे भविष्यातील डुकराच्या अवयवांचे मानवी शरीरात प्रत्यारोपण होऊ शकते, असेही म्हटले जाते. आता संशोधकांनी म्हटले आहे की, पफर नावाचा मासा आणि माणसातील दातांच्या निर्मितीसाठीची जनुके सारखीच असतात.

शेङ्गिल्डस् विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये दातांच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असणार्या घटकांमध्ये काही प्रमाणात साम्य असतेच.

मात्र, पफर मासा आणि माणसात ते अधिक प्रमाणात आहे. या दोन्ही प्रजातींमध्ये दातांच्या पुनर्निमितीसाठी एकाच प्रकारच्या स्टेमसेल्स म्हणजेच मूळपेशींचा वापर केला जातो.

या क्रियेला उत्तेजन देणारी जनुकेही दोन्हींमध्ये सारखीच असतात. पङ्गर ङ्गिश हा एक आक्रमक मासा आहे. तो खाण्यासाठी सुरक्षित नसला तरी जपानमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेल्या बल्लवाचार्यांकडून त्याचे पदार्थ बनवले जातात.

LEAVE A REPLY

*