जळगाव घरकुलप्रकरणी आज तर मोफत बससेवाप्रकरणाची उद्या सुनावणी

0
जळगाव | प्रतिनिधी :  तत्कालीन जळगाव नपाने राबविलेल्या घरकुल योजनेप्रकरणी आजी-माजी ४८ नगरसेवकांकडून प्रत्येकी १ कोटी १६ लाख आणि मोफत बससेवा प्रकरणी प्रत्येकी ५ लाख १४ हजार वसुल करण्याबाबत उद्या दि.२३ व २४ रोजी आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल व मोफत बससेवा प्रकरणी शासनातर्फे विशेष लेखापरिक्षण करण्यात आले होते.

या लेखापरिक्षणानुसार घरकुल प्रकरणी आजी-माजी ४८ नगरसेवकांकडून प्रत्येकी १ कोटी १६ लाख रुपये तर मोफत बससेवा प्रकरणी ४९ आजी-माजी नगरसेवकाकडून प्रत्येकी ५ लाख १४ हजार रुपये इतकी रक्कम वसुली करण्याबाबत नोंदविण्यात आले.

त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी वसुलीसाठी आजी-माजी नगरसेवकांना नोटीस बजावल्या. परंतु या नोटीस विरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने याबाबत आयुक्तांनी सुनावणी घ्यावी, असे आदेश दिले होते.

त्यानुसार आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे सुनावणी सुरु झाली. दरम्यान, आजी-माजी नगरसेवकांचे वकील ऍड. डि. एच. परांजपे यांनी आयुक्तांना सुनावणीचे अधिकार आहेत का नाही? यावर कोर्टात सुनावणी असल्याने निर्णयापर्यंत थांबावे अशी मागणी केली.

तसेच तत्कालीन स्विकृत नगरसेवकांची नावे वगळण्याची मागणी केली. आयुक्तांनी यासाठी महिनाभराची मुदत दिली. आता मुदत संपली असून उद्या दि.२३ रोजी सकाळी १० वाजता आयुक्तांच्या दालनात घरकुलाबाबत तर दि.२४ रोजी मोफत बससेवा प्रकरणी सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*