दीपनगर प्रकल्प कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  दीपनगर प्रकल्पातील सर्व संगठना कृती समितीतर्फे आपल्या विविध मगण्यांसाठी दि. २२ मे पासून प्रकल्पाच्या मुख्य गेटवर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांमध्ये, सर्व कंत्राटी कामगारांना कायम करणे. समान काम समान वेतन लागू करणे, कामगाराची जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे. कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्वरीत कामावर घेणे.

परिपत्रकाचे पालन न करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करणे या मागण्यांसाठी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन कंत्राटी आऊट सोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीतर्फे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

दीपनगर प्रकल्पाच्या मुख्य गेटवर पुकारण्यात आलेले आंदोलन कमलेश राणे, धनंजय चौधरी. गणपती मंदीराजवळील आंदोलन सचिन भावसार, कैलास नेमाडे तर शक्तीगड गेटवर विक्रम चौधरी, दीपक अडकमोल, गजानन चर्‍हाटे, केसरसिंग पाटील, सुनील ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सूरू करण्यात आले आहे.

आंदोलनात दोन हजार कंत्राटी कामगार सहभागी झाल्याचे समितीतर्फे कळविण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी भुषण लढे, रवी हरणकर संजय रोटे, संजय सोनवणे, महेंद्र तायडे, महेंद्र नेहते, संजय सूर्यवंशी, रवी महाजन, यतिन फेगडे परिश्रम घेत आहे.

कंत्राटदार कंपनीने कामगार उपलब्ध करून दिल्याने प्रकल्पाच्या कामावर कुठलाही परिणाम झालेला नाही.
– माधव कोठुळे, मुख्य अभियंता दीपनगर प्रकल्प.

LEAVE A REPLY

*