मालमत्ता आधारशी लिंक होणार ?

0

नवी दिल्ली । दि.21 वृत्तसंस्था-काळ्या पैशांविरोधात केंद्र सरकार आणखी एक पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. यावेळी निशाण्यावर आहे मालमत्ता.

एका केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या सूचक इशार्‍यानुसार लवकरच मालमत्तेलादेखील आधारशी जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले, लवकरच प्रॉपर्टीलाही आधार लिंक करावे लागणार आहे. काळ्या पैशांप्रमाणेच निनावी मालमत्तेवरही आता सरकारचा अंकुश येणार आहे.

पण याची घोषणा मी करत नाही. आम्ही आधी बँक खाती आधारशी जोडत आहोत. रिअल इस्टेटसाठी आम्ही अतिरिक्त निर्णय घेऊ.

नोटबंदीच्या वेळी काळा पैसा केवळ रोखीत नव्हे तर मालमत्तेत रूपांतरित केला जातो, अशी टीका सरकारवर होत होती. त्यावेळी नोटबंदीव्यतिरिक्त आणखीही अनेक पावले उचलली जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

LEAVE A REPLY

*