विहिरीत बुडून मायलेकांचा मृत्यू

0

चाळीसगाव । प्रतिनिधी-तालुक्यातील आडगांव येथे विहिरीत पडलेल्या पोटाच्या गोळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मातेसह 9 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

आशाबाई राजेंद्र पाटील व गौरश राजेंद्र पाटील अशी मृतांची नावे असून बुडल्याची घटना दि.21 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. आईसह चिमुकल्याचा करुण अंत झाल्यामुळे आडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आशाबाई राजेंद्र पाटील (वय 40), गौरश राजेंद्र पाटील (वय 9) व साक्षी राजेंद्र पाटील (वय 13) हे तिन्ही मंगळवारी 12 वाजेनतंर गौरशची शाळा सुटल्यानतंर शेतात ठिंबकचे काम चालू असल्यामुळे ते पाहण्यासाठी आडगांव शिवारातील त्यांच्या शेतात गेले होते.

शेतातील विहिरी पासून जवळच असलेल्या बोराच्या झाडाजवळ साक्षी व गौरश बोरे वेचत होते. तर आई जवळच उभी राहुण ठिंबकच्या कामाकडे पाहत होत्या.

गौरश काही वेळानतंर विहिरीच्या कठड्यावर बसला आणि थोड्यावेळानतंर आई आशाबाईसमोर तो विहिरीत तोल जाऊन पडला. आई गौरश विहिरीत पडल्याचे पाहताच क्षणाचाही विचार न करता गौरशला वाचविण्याठी विहिरीत उडी घेतली.

आई व मुलाचा विहीरीत बुडून करुण अंत झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मृतदेह ग्रामीण रुग्णालयात श्वविच्छेदनासाठी आणले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोेंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.सरदार करीत आहेत.

बिबट्याची भिती !
आशाबाई पाटील व गैारश पाटील हे दोघे विहीरीत बुडत असताना, जवळ उभी असलेली साक्षी ही चिमुकल्या भावाला व आईला वाचवण्यासाठी.

आजु-बाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकरी महिला व शेतमजुरांनी हाताने ईशारा व आवाजही देत होती. बिबट्याने हल्ला केल्याचा गैरसमज त्यांचा झाला.

त्यामुळे बुडत असलेल्या आई मुलाला वाचविण्या ऐवजी त्यांनी बिबट्याच्या भितीने गावाकडे उलट्या दिशेने पळ काढला

LEAVE A REPLY

*