खाचणे ग्रामपंचायतीमध्ये ४० लाखांचा भ्रष्टाचार : उपसरपंचासह माजी सरपंचांनी पत्रकार परिषदेत आरोप

0
चहार्डी, ता.चोपडा | वार्ताहर :  खाचणे येथील ग्रामपंचायतीच्या २०११ ते २०१५ या काळातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी विविध विकास कामामध्ये जवळपास ४० लाख रुपये भ्रष्टाचार केला आहे.

असा आरोप  विद्यमान उपसरपंच लक्ष्मण सीताराम पाटील, माजी सरपंच व विद्यमान ग्रा.प.सदस्य शशिकांत हिरामण पाटील, माजी सरपंच पुंज खुशाल पाटील आणि माहिती अधिकार कार्यकर्ते तुळशीराम वनजी पाटील यांनी  केला.

चोपडा तालुक्यातील खाचणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तुळशीराम पाटील यांनी खाचने गावात १३ वा वित्त आयोगातून झालेली कामे, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत झालेली कामे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतून झालेली कामे, भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजना, सामाजिक वनीकरण ग्रामपंचायत गावठाण योजनेतून झालेली कामे, गौण खनिज मधून झालेली खर्चाची कागदपत्रे पंचायत समिती मधून प्राप्त केली आहेत.

त्यावरून गेल्या २०११ ते २०१५ या पंचवार्षिक काळात तत्कालीन प्रथम सरपंच धनराज महारू पाटील, ग्रामसेवक शरद प्रभाकर पाटील, तत्कालीन अडीच वर्षानंतर झालेले सरपंच योगराज नामदेव पाटील, रोजगार सेवक संजय नामदेव पाटील,शिपाई शंकर गोकुळ शिंदे यांनी आपसात संगनमत करून खोटे कागदपत्रे तयार करून कागदपत्रांवर डमी स्वाक्षरी केल्या आहेत आणि लाखो रुपये परस्पर विल्हेवाट लावून भ्रष्टाचार केला आहे.

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते तुळशीराम पाटील यांनी कागदपत्रांचा आधार घेऊन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचेकडे दि ११ नोव्हेंबर २०१६ रोजी सदर कामात भ्रष्टाचार बाबत तक्रार केली आहे.

या तक्रार अर्जात १३ वा वित्त आयोगातील कामांमध्ये ८.०० लाख रु, दलित वस्ती सुधार योजनेतील कामात ४.०० लाखाचा, महाराष्ट ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ७.०० लाख रु,भारत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून ९.०० लाख रु, सामाजिक वनीकरण योजनेतून २.०० लाख रु,गौण खनिज योजनेतून २२ ते २५ लाख रु असे एकत्रित जवळ पास ५० लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप पत्रकार परिषद करण्यात आला.

दरम्यान केलेल्या तक्रारी अर्जवरून विस्तार अधिकारी जे. पी.पाटील यांनी चौकशी केली आहे. चौकशी वेळी ज्यांच्या नावे म्हणजे बोगस कंत्राटदार रवींद्र गंगाराम धिवर यांच्या नावे ३५ हजार रु चा धनादेश काढलेला आहे

त्या संदर्भात स्वतः रवींद्र गंगाराम धिवर यांनी मी कोणत्याही प्रकारचे काम केले नसून माझ्या नावे बोगस धनादेश वटवून परस्पर स्वाक्षरी करून पैसे घेतले आहेत. असे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी रोजगार हमी योजनेतून झालेल्या कामात रोजगार प्रकाश मल्हारी पांचाळ यांचे नावे स्वाक्षरी घेऊन पैसे परस्पर काढले असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. ते पत्रकार परिषदेत हजर होते.

पत्रकार परिषदेत सांगतांना शशिकांत हिरामण पाटील यांनी सांगितले की, या विविध योजनांतून कामे काही अंशी झाली आहेत तर संबंधित कामे अर्धवट असून पैसे मात्र सर्व काढण्यात आले आहेत.

३० टक्के रकमेतच कामे झाली आहेत ७० टक्के रकमेचा अपहार केला असल्याचे सांगितले.तसेच चौकशी अधिकारी जे.पी.पाटील हे चौकशी अहवाल देत नसल्याचा ही आरोप यावेळी करण्यात आला.

पत्रकार परिषदेस खाचणे येथील माजी सरपंच आणि विद्यमान ग्रा.प. सदस्य शशिकांत पाटील,माजी सरपंच पुंजु खुशाल पाटील,माहिती अधिकार कार्यकर्ता तुळशीराम पाटील, प्रकाश मल्हारी पांचाळ, रवींद्र गंगाराम धीवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*