राजवड येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्त्या

0
पारोळा |  प्रतिनिधी :  तालुक्यातील राजवड येथील ६० वर्षीय कर्जबाजारी शेतकर्‍याचे दबापिंप्री ता.पारोळा शिवारातील विहीरीत आत्महत्त्या केल्याची घटना  उघडकीस आली.

याबाबत राजवड येथील अभिमन किसन पाटील (वय ६०) हे गेल्या तीन दिवसापासुन घरातून निघुन गेले होते. ते रत्नापिंप्री येथे भाचे राजु उत्तम पाटील यांचेकडे येवून भेट घेवून गेले असता दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता दबापिंप्री शिवारातील मुकूंदा मोतीराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगतांना व कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले.

सदर इसम हा दोन-तीन दिवसापासुन पाण्यात पडलेला असावा असा अंदाज आहे. त्यांचेकडे ५ बीघे शेती असुन सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे ते नेहमी विवंचनेत होते. म्हणुन त्यांनी आत्महत्त्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यांचा मृतदेह हे.कॉ. प्रकाश चौधरी, ईश्‍वर ठाकुर, किरण पाटील, बारी, रोशन पाटील आदींनी आणुन डॉ. प्रशांत रनाळे यांनी शवविच्छेदनकेले. अभिमन पाटील यांच्या पश्‍चात २ मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

याबाबत संदीप गोरख पाटील (राजवड) यांनी पाचोरा पो.स्टे.ला रविंद्र रावते करीत आहेत.

LEAVE A REPLY

*