खान्देशकन्या प्रियंका टोके अभिनित ‘ग्रेट माय इंडिया’ आज प्रदर्शित

0
जळगाव |  खान्देशकन्या व मराठी सिने अभिनेत्री प्रियंका टोके हिने प्रमुख अभिनय केलेला ‘ग्रेट माय इंडिया’ हा चित्रपट शुक्रवारी 19 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
या बालचित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.शशिकांत डोईफोडे, निर्माते डॉ.राजेंद्र खेडेकर असून मराठी पहिला थ्रीडी बालचित्रपट आहे. या चित्रपटात आर्या घारे ही देखील कलावंत आहे.
प्रियंका हिने या चित्रपटात इंग्लिश मेडीयम स्कूलच्या शिक्षिकेची भूमिका बजावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील सुभाष व सौ. प्रितमा टोके यांची प्रियंका ही कन्या आहे.
सामान्य शेतकर्‍याच्या या कलावंताने कला क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. मुळजी जेठा महाविद्यालयात बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पदवीचे शिक्षण पुणे येथे घेतले. पुणे येथे अभिनयाचे शिक्षण घेतले, आज प्रियंका टोके ही विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. याआधी अभिनेत्री प्रियंका टोके हिचा ‘मोनेळ माया’ हा कोकणी चित्रपट प्रदर्शित झालाय.
या चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शिंदे, सुनिल गोडबोले, श्रीराम पेंडसे आणि बाल कलावंत आर्या यांच्या भूमिका आहेत. नुकताच प्रियंका टोके या अभिनेत्रीचा साई पदमालय मोशन पिकचर्स प्रेझेन्टस् ‘झाला वारा मंद’ हा रोमन्टीक गाणे असलेला अल्बमही रिलीज झाला आहे.
याचे संजय चौधरी, सहनिर्मिाते गणेश लोखंडे हे असून संगीतकार प्रविण जोशी आहे. नृत्य दिग्दर्शन सुप्रसिद्ध विठ्ठल पाटील हे आहेत. या प्रसाद धेंड हा अभिनेता आहे. कार्यकारी निर्माता प्रविण वानखेडे, गीत संजय विलास यांचे असून दिग्दर्शक नितीन भास्कर हे आहेत.
ग्रेट माय इंडिया’ हा थ्रीडी बालचित्रपट आज 19 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत असून जळगावच्या आयनॉक्स आणि नटवर थियेटर तर मुक्ताईनगरच्या बालाजी थियेटर येथे प्रदर्शित होणार आहे.
मुंबई येथे नुकताच ‘गे्रट माय इंडिया’ या चित्रपटाचा ‘प्रिमियर’ शो झाला. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
खान्देशकन्या केलेला सदर चित्रपट कलाप्रेमीनी पहावा, असे आवाहन मराठी फिल्मस् चेंबर्स ऑफ कॉमर्सचे (कोल्हापूर)चे सचिव तुषार वाघुळदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*