केळी पिक विम्याच्या लाभात तफावत

0

जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-जिल्ह्यात केळी पिक विम्याचा लाभ देण्यात मोठी तफावत आढळुन आली असल्याने यासंदर्भात चौकशी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्याचा ठराव आज झालेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आला.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता गृहकर्जाच्या व्याजदरात दोन टक्क्याने कपात केली असुन आता 11 टक्के व्याजदर निश्चीत करण्यात आला आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगामासाठी 62 कोटी तर चोपडा सुतगिरणीला 12 कोटी रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच दुध उत्पादक शेतकर्‍यांना कर्जस्वरूपात गाई-म्हशी वाटप करण्याचाही निर्णय आज अंतीम करण्यात आला आहे. दुध संघाकडुन यासाठी शेतकर्‍यांचे प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. रोहीणी खडसे यांनी दिली.

जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या गृहकर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. रूपये 10 लाखावरून 15 लाख रूपयांपर्यंतची ही वाढ असुन 11 टक्के असा नवा व्याजदर निश्चीत करण्यात आला आहे.

बेलगंगाच्या विषयावरून काथ्थ्याकुट
जिल्हा बँकेने चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील बेलगंगा सहकारी साखर कारखाना अंबाजी ट्रेडींग कंपनीला विकला आहे. या कारखान्याच्या भविष्यनिर्वाह निधीची 11 कोटी रूपयांची रक्कमही जिल्हा बँकेने न्यायालयाकडे दिली आहे.

दरम्यान हे 11 कोटी रूपये अर्टी शर्तीनुसार अंबाजी ट्रेडींगकडुन वसुल केल्यानंतरच कारखान्याचा ताबा द्यावा या विषयावरून संचालकांमध्ये चांगलाच काथ्थ्याकुट झाला.

याविषयाला संजय पवार यांनी विरोध दर्शविला. सभेला संचालक माजी मंत्री गुलाबराव देवकर, अ‍ॅड. रविंद्र पाटील, गणेश नेहते, वाडीलाल राठोड, तिलोत्तमा पाटील, संजय पवार, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थि होते.

 

LEAVE A REPLY

*