उंदिरखेडा येथे ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू

0
पारोळा  | श.प्र.  :  तालुक्यातील उंदीरखेडा येथील सहा जण ट्रॅक्टरवरुन शेतात शेणखत वाहतुक करीत असतांना ट्रॅक्टर शिकण्याच्या नादात भरधाव ट्रॅक्टर वरचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर झाडावर आदळल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असुन चार जणांना किरकोळ मार लागल्याची घटना उंदीरखेडा नागेश्वर फाट्यादरम्यान घडली.

याबाबत उंदीरखेडा येथील सागर अरुण शिंदे (२१), अतुल रघुनाथ बोरसे यांच्यासह चार जण हे टॅ्रक्टर क्रं. एम.एच१९-ए.बी.-८४४१ वर शेणखत टाकण्यासाठी रात्री आठ वाजेपासून गेले.

शेवटची खेप टाकून परतत असतांना देविदास रामदास पाटील यांच्या शेताजवळ भरधाव ट्रॅक्टरवर नियंत्रण न आल्याने ट्रॅक्टर लिंबाच्या झाडावर आदळल्याने उलटून सागर अरुण शिंदे यांचा ट्रॅक्टर खाली दबुन जागीच मृत्यू झाला

तर अतुल बोरसे यांचा हात व पाय मोडला जावून जबर दुखापत झाली असुन इतर चार मजुर फेकले जार्वूीन किरकोळ जखमी झालेले आहेत.

सागर हा अतुलला टॅ्रक्टर शिकविण्याच्या नादात हि घटना घडल्याने एकुलता एक सागरला त्याचा जीव गमवावा लागला तर अतुलची प्रकृती गंभीर असुन तो धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

याबाबत पारोळा पो.स्टे.ला बापु हिम्मत शिंदे यांनी फिर्याद दिल्यावरुन अतुल बोरसे विरुद्ध ३०४ प्रमाणे सागरच्या मरणास कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हे.कॉ.रविंद्र रावते करीत आहेत.

LEAVE A REPLY

*