खेकडा वाचवणार मलेरियापासून ?

0

बीजिंग | वृत्तसंस्था :  जगात अनेक देशांमध्ये विशेषतः आङ्ग्रिकन देशांमध्ये मलेरियाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्याला रोखण्यासाठी सतत नवनवे संशोधन होत असते. आता खेकड्याचे कवच आणि चांदीच्या सूक्ष्मकणांपासून बनलेल्या स्प्रेमुळे मलेरियाला अटकाव होऊ शकतो, असा दावा चीनमधील संशोधकांनी केला आहे.

या स्प्रेमुळे मलेरियाला कारणीभूत ठरणार्या डासांचा प्रसार थांबतो, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हा स्प्रे पर्यावरण अनुकूल असून त्याच्या चाचण्या भारतातच झाल्या आहेत.

नॅशनल तैवान ओशन युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ जियांग शियो हवांग म्हणाले, थोड्या प्रमाणात हे द्रावण एनोङ्गीलीस सनडाइकस या डासाच्या पैदाशीवर प्रभावी पद्धतीने अंकुश लावण्यासाठी वापरता येऊ शकते.

हा डास मलेरियाचा वाहक मानला जातो. मात्र, डासांचे नैसर्गिक शत्रू असलेल्या माशांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. हे संशोधन करणार्यांमध्ये तामिळनाडूतील भारतियार विद्यापीठाचे शास्त्रज्ञही सामील होते.

या शास्त्रज्ञांनी चिटोसान किंवा चिटिन या नैसर्गिक विषारी पदार्थाचा वापर या संशोधनासाठी केला. हा पदार्थ जखमांवरील उपचार आणि जैविक पद्धतीने नष्ट होणार्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजसाठी केला जातो.

संधिपाद प्राण्यांचे कवच, पक्ष्यांची चोच किंवा किड्यांचे अंडे यामध्ये चिटिन हा पदार्थ सापडतो, असे संशोधकांनी सांगितले. याचे रसायनिक स्वरूप सहज बदलता येते, हा अत्यंत प्रभावी आणि निसर्गात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तो किङ्गायतीही आहे.

LEAVE A REPLY

*