दूरूस्त केलेल्या रस्त्यावरील कचवरून मोटारसायकल घसरून माजी सभापती जखमी

0

जळगाव | प्रतिनिधी : ख्वॉजा मिया दर्ग्याजवळ दूरूस्त केेलेल्या रस्त्यावरील खडीच्या बारीक कचवरून मोटारसायकल घसरल्याने जळगाव मनपा स्थायी समितीचे माजी सभापती तथा पाणी पुरवठा सभापती नितीन बरडे जायबंदी झाले आहेत.

त्यांच्या गुडघ्याला व हाताच्या कोपराजवळ जखमा झाल्या आहेत. शहरातील रस्त्यांतील खड्डे बुजविण्यासाठी मनपातर्फे मुरुम किंवा खडीच्या बारीक कचचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यात डांबर कोठे आहे ते शोधूनही सापडत नाही. बारीक कच व मुरूम टाकून रस्त्यातील खड्डे दूरूस्त केल्याचे दर्शविले जात आहे.

परंतू या मुरूमावरून व कचवरून वाहने घसरत आहेत. घरसलेल्या वाहनासोबत वाहनचालक घसरत असून हातपाय, अंग खरचटत आहेत. तर अनेकांना खोलवर जखमीही होत आहेत. तर काहींना हाता पायाला फॅक्चरही होत आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी मुरुम किंवा कच पडतो तेथे धुळीचा त्रास तर होतोच आहे.

पण लक्षात कोण घेतो ?

याबाबत जयबंदी वा जखमी झालेले नागरीक महापालिकेत कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांकडे तक्रारी करतात. परंतू कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांना वाहने निट चालवण्याचा सल्ला देत त्यंाची खिल्ली उडवतात.

आता तरी जाग येईल का ?

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे हे ख्वॉजीमिया दर्ग्याजवहील खड्डे दूरूस्त केेल्या रस्त्याने दुचाकीने जात असतांना खडीच्या बारीक कचवरून त्यांची मोटारसायकल घसरून ते खाली पडले. त्यात त्यांच्या हाता पायाला खरचटले आहे. निदान त्यांना झालेल्या जखमा पाहता महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना जाग येईल का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*