जळगावला उष्माघातामुळे एकाचा मृत्यू

0
जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकिस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्टेशनपरिसरात असलेल्या भाई-भाई पान ठेला यांचे मोठे काका दत्तात्रय भावलाल भावसार (वय ७७) यांचा मृतदेह शिवाजीनगर हुडको परिसरातील एका मोकळ्या जागेत आढळुन आला.

नागरीकांसह शहर पोलीसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. याठिकाणी वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. कासमवाडीत ते राहतात.

त्यांना सुरेखा भावसार ही मुलगी असून रविंद्र वसंत भावसार यांचे ते मोठे काका होते. दरम्यान उन लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा कयास लावण्यात येत होता.

याप्रकरणी शहर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सफौ.करीम शेख करीत आहेत.

LEAVE A REPLY

*