राज्यात राजकीय भूकंप ?

0

मुंबई । दि.7 । वृत्तसंस्था-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

काँग—ेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे.

त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येणार आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे.

तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व आले.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग—ेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे

 

 

 

LEAVE A REPLY

*