लग्नात नाचतांना एकाचा मृत्यू

0
अमळनेर/कळमसरे |  प्रतिनिधी : हळदीच्या रात्री नवरदेवाला खांद्यावर घेवून नाचत असतांना थकवा आल्यानंतर ढसा ढसा पाणी पिल्याने अचानक चक्कर येवून आधिकार दौलत चौधरी (वय ३६) राहणार नीम ता.अमळनेर या तरुण मित्राचा लग्नात नाचता-नाचताच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली.

सदरची घटना दि.१५ रोजी रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास घडली.अधिकार हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता.त्याची पत्नी,मुलगा ,मुलगी नीम येथे सुटीत आलेले होते.

भानुदास आनंदा चौधरी यांच्या मुलाची हळद होती.मित्राचे दि.१६ रोजी लग्न असल्याने तो गावाकडे आला होता.यानंतर तो लागलीच पत्नी व मुलांना परत पुणे येथे घेऊन जाणार होता. काल रात्री तो बँड वाजेत गावातील सर्वे मित्रांबरोबर नाचत होता; अचानक छातीत कळ निघाल्याने तो खाली बसला मात्र जागेवरच त्याचा मृत्यु झाल्याने गावात शोककळा पसरली.

अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, लहान भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.आधीकार हा घरातील कर्ता पुरुष गेल्याने या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.या घटनेमुळे गावात एकही घरात चुल पेटली नाही.

आधिकार हे कळमसरे येथील माजी मुख्याध्यापक जी.आर.चौधरी यांचा भाचा तर शहापुर हायस्कूलचे शिक्षक राजेन्द्र चौधरी यांचा चुलत भाऊ,तर नीम विकास सोसायटीचे चेरमन प्रवीण गोरखनाथ चौधरी यांचे मामेभाऊ होत.भानुदास चौधरी यांचे मुलाचे लग्न दु:खमय वातावरणात संपन्न झाले.

LEAVE A REPLY

*