टुव्हिजनचे दोन एयर कंडिशनर

0
टुव्हिजन कंपनीने भारतात एक आणि दीड टन क्षमतेचे दोन एयर कंडिशनर बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत.

टुव्हिजन कंपनीने एक टन क्षमतेचा टिडब्ल्यूएससी १४१ यू आणि टिडब्ल्यूएससी २४१ यू हे एक आणि दीड टन क्षमतेचे दोन नवीन मॉडेल्स २५ हजार ९९० रुपये व ३० हजार ९९० रुपयाता रिटेल स्टोअर्समधून ऑफलाईन पध्दतीने ग्राहकांना उपलब्ध केले आहेत.

यात ट्युएयर हे तंत्रज्ञान इनबिल्ट स्वरूपात प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने उर्जेची बचत होणार असून उत्तम दर्जाचे वातानुकुलन होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या दोन्ही मॉडेल्सला थ्री-स्टार मानांकन देण्यात आले आहे. यात गोल्ड फिन हे फिचर देण्यात आले असून यामुळे मॉडेलच्या आतील भागाला गंजरोधक कवच मिळणार आहे.

तर फोर-वे एयरफ्लो तंत्रज्ञानाच्या मदतीने चारही बाजूंनी सारख्या प्रमाणात थंड हवा मिळण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*