आरोग्य आधार म्हणजे समाज सेवेचे व्रत – जिल्हाधिकारी

0
जळगाव |  प्रतिनिधी  : नवोदय सेवा प्रतिष्ठानचा आरोग्य आधार हा अत्यल्प दरात वैद्यकीय चाचण्या करणारा प्रकल्प म्हणजे समाज सेवेचे युवकांनी घेतलेले व्रत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

ललीत कला भवन येथे आरोग्य आधारचा या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी निंबाळकर बोलत होते. या शुभारंभ सोहळयावेळी जेष्ठ पॅथोलॉजिस्ट डॉ.पी.एन.पाटील, महापौर नितीन लढ्ढा, जेष्ठ समाजसेवी दलुभाऊ जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्य आधार मुळे गरीब रूग्णांना फायदा होणार असून त्यासाठी सर्व डॉक्टरांनी हॉस्पीटल मध्ये या प्रकल्पाची माहिती व तपासण्याचे दरपत्रक ठळकपणे लावावे असे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आवाहन करून या केंद्रात आरोग्य विषयक समुपदेशन सेंटर देखील सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ.पी.एन.पाटील यांनी आज विविध आजारांमुळे अनेक चाचण्या कराव्या लागतात व त्या खर्चिक आहेत. या प्रकल्पामुळे गरीब व्यक्तींसाठी खरोखर आधार निर्माण झाला आहे असे सांगितले. सेवाभाव असलेल्या युवापिढीचा नवा उदय म्हणजे नवोदय सेवा प्रतिष्ठान आहे.

आपल्याच क्षेत्रात येणार्या प्रकल्पाचा स्पर्धक म्हणून विचार न करता, स्वार्थ बाजूला ठेऊन युवकांना प्रोत्साहन, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या डॉ.पी.एन.पाटील यांचे महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगतून कौतुक केले.

शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेला आर्थिक अडचणींमुळे मर्यादा येत आहेत अशी महापौर लढ्ढा यांनी खंत व्यक्त केली. मात्र यावर उपाय म्हणून मनपाच्या शाहू महाराज रूग्णालयात लोकसहभागातून स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.

आरोग्य आधार सारख्या प्रकल्पांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. जेष्ठ समाजसेवी दलुभाऊ जैन व केशव स्मृती सेवा समुहाचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास आ.राजूमामा भोळे, जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, नगरसेवक नितीन बर्डे, डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे, डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ.सागर न्याती यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक अध्यक्ष निखील बियाणी यांनी तर सुत्रसंचालन ऍड.राहुल लाठी यांनी केले. रोहन बाहेती यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी किरण बच्छाव, डॉ.निखील पाटील, डॉ.निरंजन चव्हाण, शैलेश राणे, कुमार वाणी, विनय बेंडाळे, राहुल बिर्ला, डॉ.नितीन चौधरी आदिंसह त्यांचे कुंटूंबीय व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*