कृषी, पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी : धरणगाव तालुका समन्वय समिती अध्यक्ष पी.सी.आबांचे आदेश

0
धरणगाव |  प्रतिनिधी :  तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अनागोंदी कारभारावर आज तालुका समन्वय समितीच्या बैठकीत अध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी आसूड ओढले.

कांदा चाळीसाठी अनुदान मंजूर झाले असतांना तालुका कृषी अधिकारी टक्केवारीसाठी अडवणूक करतो…माती परिक्षणावर १० लाख रूपये खर्च झाले मात्र, शेतात आरोग्य पत्रिका मिळत नाही.

पाटबंधारे विभागाने ४५ लाख रूपये पाटचार्‍या दुरूस्तीवर खर्च केल्याचे दाखविले मात्र, प्रत्यक्षात काम झालेच नसल्याच्या तक्रारी आजच्या बैठकीत करण्यात आल्या.

याप्रकाराने संतप्त झालेले अध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले. पी.सी.आबांच्या या आक्रमक पावित्र्याने तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

तहसील कार्यालयात तालुका समन्वय समितीची बैठक झाली. तालुका कृषी अधिकारी श्री.माळी यांच्याबाबत या बैठकीत तक्रारींचा पाऊसच पडला. परिणामी श्री.माळी यांची विभागांतर्गत चौकशी करण्याचे आदेश पी.सी.पाटील यांनी दिले.

श्री.माळी यांनी शेतकर्‍यांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनेची माहिती १४ मे पर्यंत मुदत असतांना सुध्दा शेतकर्‍यां पर्यंत पोहचू दिली नाही असा ठपका याबैठकीत करण्यात आला.

पाटबंधारे विभागात गोलमाल

गिरणा पाटबंधारे विभागात पाटचार्‍या दुरूस्तीच्या कामावर खात्याअर्ंगत ४५ लाख रूपये खर्च दाखविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात दुरूस्तीच्या नावाने बोंबाबोंब असल्याने ४५ लाख रूपये खर्च कुठे केले याचीही चौकशी करण्याचे आदेश पी.सी.आबा यांनी दिले आहेत.

संजय गांधी निराधार योजनेत पैसे देऊन बोगस लाभर्ती आहेत त्यांचे चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तालुका पुरवठा अधिकारी परस्पर धान्याची परस्पर विल्हेवाट लावत असून दुकानदारांना धान्य कमी भावात विकत असल्याचे सांगून त्यांचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

जलयुक्तही भ्रष्टाचार युक्तच!

तालुक्यात जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामातही भ्रष्टाचार झाला असून खोटे अंदाज पत्रक तयार करून जास्तीचे देयके देण्यात आली आहेत. शिवाय शिवार निवडतांनाही चुकीच्या पध्दतीचा वापर करण्यात आल्याने या प्रकाराचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

सहाय्यक निबंधक, विविध कार्यकारी सोयायटीच्या अनिष्ट ताफवतीत असतांना कोर्ट कमी सर्व ५१ सदस्यांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये घेतलेली आहेत यांची व गटसचिव अनिल पाटील यांनी प्रत्येक गटसचिवाकडून त्यांच्या फरकेतून प्रत्येकी १० हजार रुपये घेतले आहेत यांची पण चौकशी करण्यात यावी असा प्रस्ताव पी.सी.आबा यांनी ठेवला.

सचिव बदलीचे सर्व अधिकार संस्थांना असून देवाण घेवाण करून झालेल्या बदल्यांनची चौकशी करावी व ऑडिट मध्ये त्रुटी असून कार्यवाही करण्यात यावी वराड येथील घरकुल योजनेत एका वेक्तीस दोन वेळेस लाभ मिळत असून यांची चौकशी करण्यात यावी व तालुक्यात केडर्सचे कार्यालय करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली.

आजच्या या बैठकीला जि.प.अध्यक्षा सौ.उज्ज्वला पाटील, जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे, पं.स.सदस्य प्रेमराज पाटील, राजेंद्र पाटील भोद खुर्द , कृउबास संचालक जगन पाटील, समन्य समितीचे सदस्य चंद्रशेखर पाटील, प्रशांत अत्तरदे यांच्यासह तहसीलदार कैलास कडलग, बीडीओ श्री.सनेर यांच्यासह तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*