अडावद ग्रा.पं.वर हंडामोर्चा

0
अडावद ता.चोपडा, | वार्ताहर : येथील ग्रामपंचायत कार्यालयावर  वार्ड क्रमांक ४ मधील महिलांनी हंडा मोर्चा आणत ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला.

तर महिलांच्या या मोर्चास समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत कार्यालय गाठत पिण्याच्या पाण्याची समस्यासह गावातील सांडपाण्याच्या तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याची मागणी केली. यावेळी सुमारे २०० ते ३०० महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला.

शेवटी सरपंच पती सचिन महाजन यांनी मोर्चेकर्‍यांची समजुत काढीत येत्या दोन दिवसांत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्यास पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठाण मांडू अशी तंबी देत मोर्चातील महिला माघारी गेल्या.

अडावद येथील प्रभाग क्रमांक ४ मधील पाटील वाडा, शिंपी गल्ली, सुतार गल्ली, न्हावी वाडा, मोमिन मोहल्ला या भागात गेल्या महिनाभरापासुन कमी दाबाचा व बेभरवशाचा पाणीपुरवठा होत असल्याने येथील पाणीपुरवठ्याची समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

दि. १५ रोजी तर या भागात चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात आला आणि तो सुध्दा मोजुन ङ्गक्त १५ मिनीटे त्यामुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा आणला.

यावेळी अंजनाबाई पाटील, रेखा पाटील, मालती पाटील, संगिता सुतार, सोनाली पाटील, उज्वला पाटील, प्रमिला पाटील, छाया पाटील, लिलाबाई पाटील, आशा महाजन, वैशाली महाजन, अनिता कोळी, पुष्पा पाटील, आशाबाई पाटील, मंगला पाटील, रंजनाताई पाटील, शोभाबाई पाटील, लताबाई पाटील, मिनाताई पाटील, ज्योतीबाई पाटील या महिलांनी हंडा गुंडा पाण्याची भांडी आणीत मोर्च व्दारे ग्रामपंचायत कार्यालय दणाणून सोडीत आपल्या समस्या मांडीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

या मोर्चा त परीसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. त्यात गोपाल सुतार ,किरण पाटील,सुनिल पाटील,हेमंत सुतार,भुषण सुतार,भावेश पाटील ,प्रकाश पाटील,धिरज पाटील, जुनेद खान, शे.महमुद शे.महताब,बशीरखान नजीरखान,जाकीरखान शब्बीरखान,सद्दाम पिंजारी,आबिद खान आदींसह शेकडो महिला ग्रामस्थांची मोर्चात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*