महाराष्ट्र बुध्दीबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र डोंगरे यांची हकालपट्टी

0
जळगाव |  प्रतिनिधी  : महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा १४ मे २०१७ रोजी रविवार रोजी जैन हिल्स जळगाव येथे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन त्यात ११ ठराव पारीत करुन संघटनेच्या विरोधात कार्य करणारे मुंबईचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र डोंगर यांना सर्वानुमते संघटनेच्या उपाध्यक्ष पदावरुन व सभासदत्वापासुन त्यांना कायमस्वरुपी काढण्यात आले.

महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक जैन असुन धर्मदाय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार संघटनेच्या सभा सुरु आहे.

५ मे रोजी पुणे येथे कार्यकारी मंडळाची सभा अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. त्यात संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्यावर संघटनेच्या विरोधात गैरकृत्य केल्याबाबत संघटनेचे सहसचिव फारुख शेख यांनी लेखी अहवाल सभेसमोर मांडला\

त्यांना संघटनेच्या पदासोबत सभासदत्व रद्द करण्याचा ठराव पारीत झाला होता. त्या अनुषंगाने कालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्का मोर्तब होऊन त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

पारीत झालेले इतर ठराव

मागील सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वार्षिक लेखा जोगा कार्यकारी मंडळाने पास केलेले ठरावास मान्यता , जळगावचे खैरनार ऍन्ड खैरनार यांची पुढील वर्षासाठी ऑडीटर म्हणुन मान्यता, वार्षिक अहवालास मंजुरी, महाराष्ट्र बुध्दीबळ संघटनेने केलेल्या कोर्ट केसची माहिती व संघटनेवर झालेल्या कार्यवाहीची माहिती देऊन ते ठराव पारीत करण्यात आले.

आयत्या वेळेवरील विषयात महापौर चषक (मुंबई) स्पर्धा संघाना घेणार नाही. रविंद्र डोंगरे यांची पदावरुन व सभासदत्वापासुन गंच्छती, कोल्हापुर येथील सह धर्मदाय आयुक्त यांच्याकडे ए एम सी ए (ऑल मराठी चेस असो.) विरोधात दावा दाखल करणे इत्यादी ठराव पारीत करण्यात आले.

सभेत ३६ जिल्ह्यापैकी एकुण २५ जिल्ह्याचा समावेश होता. चर्चेत पी बी भिल्लारे (मुंबई), विलास म्हात्रे (रायगड), रतन सिंगाडे (धुळे), सिध्दार्थ मयुर (पुणे), दिपक कुमठाकर (ठाणे), निनाद पेंडसेकर व ऍड आपणकर (पालघर), भरत चौगुले (कोल्हापुर), चंद्रकांत वडावळे (सांगली), मंगेश गंभीरे (नाशिक), यशवंत बापट (अहमदनगर), अंकुश रक्ताळे (बुलढाणा), संदीप साळुंखे (नंदुरबार) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सभेचे सुत्रसंचालन व आभार महाराष्ट्राचे सहसचिव फारुख शेख यांनी केले.

LEAVE A REPLY

*