भारनियमनाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे 9 तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत असून दिवाळीच्या काळात भारनियमन बंद करावे.

अन्यथा महावितरणच्या कार्यालयाचा विजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव शहर महानगर यांच्यासह शहरातील नागरीकांतर्फे महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

महावितरणतर्फे गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे 9 तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. तसेच शहराच्या तापमानात देखील प्रचंड वाढ झाली असून ऑक्टोंबर महिन्यात देखील मे हिट चा तडाखा जळगावकरांना सहन करावा लागत आहे.

तसेच त्याचा फटका हा उद्योग व्यवसाय यासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तसेच दररोज दिवसातून नऊ तासापेक्षा अधिकवेळ होणार्‍या भारनियमामुळे नागरीकांच्या जिवाही काहिली होत आहे. तसेच नियमीत वीज बिल भरणार्‍यांना देखील भारनियमाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे.

दरम्यान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या दिवाळी व अन्य सणासुदिच्या काळात महावितरणकडून सुरु असलेले भारनियमन बंद करुन अखंडित विजपुरवठा करुन नागरीकांना दिलासा द्यावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी अशफाक पिंजारी, प्रतिभा शिरसाठ, डॉ. शरीफ बागवान, फहीम पटेल, रऊफ शेख, डॉ. सुषमा चौधरी, गायत्री सोनवणे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ऑक्टोंबर महिन्यात देखील शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच महावितरणतर्फे भारनियमन सुरु करण्यात आले आहे.

त्यामुळे जळगावकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या महाविद्यालय व शाळांचा परिक्षा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांना देखील तसेच शहरातीच उद्योग धंद्यांसह व्यवसायालाही भारनियमनचा फटका सहन करावा लागत आहे.

त्याचप्रमाणे दिवाळी सण प्रकाशपर्वाचा आहे. अश्या प्रकाशपर्वात भारनियमन करु नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी निलेश पाटील, अयाज अली. सुरेश सोनवणे, प्रतिभा कापसे, राजू मोरे, शोभा बारी, लता मोरे, आबा कापसे, शरीफ पिेजारी, लिना चौधरी, कैलास मोरे, शंभू रोकडे, धर्मेद्र पाटील, गणेश नन्नवरे, आसिफ कपाटवाले, नंदू महाजन, आशा येवले, अर्चना कदम, अष्पाक मिर्झा, रविंद्र पाटील, सुनिल पाटील, अ‍ॅड. सचिन पाटील, प्रतिभा शिरसाठ, सलिम इनामदार, चेतन सनकत आदी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*