पेट्रोल पंपचालकांचा 13 ला देशव्यापी संप

0

नवीदिल्ली । दि.7 । वृत्तसंस्था-आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपचालकांनी शुक्रवारी (दि.13) पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

डिलर मार्जिन आणि कमिशन आणि पुरवठ्यातील तफावत तसेच पेट्रोलियम पदार्थांचा समावेश जीएसटीत करावा, या मागणीसाठी पेट्रोल पंपचालकांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे.

दि. 12 रोजी मध्यरात्री बारा ते दि. 13 च्या मध्यरात्री 12 पर्यंत देशातील सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अजय बन्सल यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने जर आम्हाला योग्य प्रतिसाद दिला नाही तर आम्ही 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

LEAVE A REPLY

*