न्हावी ग्रामपंचायतीची ‘हरीत ग्राम – समृध्द ग्राम’ कडे वाटचाल : शेतकर्‍यांच्या सहकार्यातून वृक्षसंवर्धन,शासनाकडून मिळविले अनुदान

0
ललित फिरके | न्हावी,ता. यावल :  शासनाच्या पर्यावरण संतूलित ग्रामसमृध्दी योजनेतर्ंगत न्हावी ग्रामपंचायत ‘हरीत ग्राम – समृध्द ग्राम’ होण्याकडे वाटचाल करत आहे. १७ फेब्रुवारी १९४१ मध्ये स्थापना झालेल्या न्हावी ग्रामपंचायतीने पर्यावरण संतूलित ग्रामसमृध्दी योजनेतर्ंगत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे.
येथे केले वृक्षारोपण
न्हावी ग्रामपंचायतीने न्हावी ते मधुकर साखर कारखाना या सुमारे अडीच किमी च्या रस्त्यावर दूतर्फा झाडे लावली असून त्यातील ७५ टक्के झाडे जगली असून चांगलीर पुरूषभर उंचीची झाली आहेत.

वृक्ष संवर्धनात शेतकर्‍यांची साथ

गाव हरीत गाव करण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीने शेतकर्‍यांना विश्‍वासात घेतले. शेताच्या बांधावर ही झाडे लावली. शेताच्या काठापयर्ंत पिके असल्याने तेथपर्यत ठिबकचे पाणी येत होते
. या पाण्यावरच ही झाडे जगविली आहेत. शेतातील पिके संपली असली तरी ही झाडे मात्र हिरवीगार असून वार्‍याबरोबर डोलत आहेत.

या झाडांची केली लागवड

अशोक, वड, बॉटम बाम, कडूनिंब, गुलमोहर यासारख्या विविध वृक्षांची लागवड केली आहे. या रस्त्यावर अशोकाची १२५ झाडे, वडाची १००, बॉटम बामची ५० व इतर झाडे असे एकूण १ हजार झाडे जगविली आहेत. यामुळे हा रस्ता हिरवागार झाला असून कडक उन्हाळ्यातही या रस्त्याने गारवा मिळत आहे.
मोक्याच्या ठिकाणीही वृक्षारोपण
गावात कोणासही अडचण होणार नाही अशा मोक्याच्या जागेवरही वृक्षारोपण करून ती झाडे जगविली आहेत. त्यामुळे गुरांसह माणसांना दुपारच्या वेळी विसावा घेता येतो. गावच्या पूर्वेस असलेल्या खंडोबा देवस्थानाच्या बाजूस इगार्ड लावून वृक्ष लागवड केली आहे.
शासनाकडून मिळविले अनुदान
सन २०१३ ते १४ या वर्षात ६२,९५० रूपये वृक्षलागवडीवर खर्च करण्यात आले आहेत. तर सन २०१४ ते १५ व २०१६ – १७ या वर्षात ४,७७,०७८ रूपये इतके अनुदान शासनाकडून मिळविले आहे.
टँकरने दिले जाते पाणी
झाडे लावण्यानंतर ती जगण्यासाठी त्यांना नियमितपणे पाणी देण्यात गरज असते. ही गरज ओळखून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे कर्मचारी विशेष लक्ष देत असतात. जेथे पाणी देण्याची व्यवस्था नसेल तेथे टँकरने पाणी दिले जाते. यामुळे ९९ टक्के झाडे जगली आहेत.

विकासासाठी सहकार्यच

ग्रामपंचायत प्रशासनाने व सरपंच, उपसरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी मांडलेल्या विकासात्मक ठरावांनार नेहमीच सहकार्य केलेल आहे.

गेल्या पाच वर्षात शासकीय आदेशानुसार आलेल्या सर्व योजना राबविण्याचा प्रयत्न सर्व ग्रामपंचायत सदस्य करत आहेत. आमदार निधी व खासदार निधीतून हायमस्ट लॅम्प लावले. तसेच गावातील काही रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणही केले आहे.
यशवंत माधव तळेले, सदस्य ग्रामपंचायत

विविध विकास कामांनी गाव समृध्दीकडे

सन २०१४ – १५ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतर्ंगत बेघर प्लॉटवरती १ लाख लिटरची पाण्याची उंच टाकी बांधण्यात आली आहे. अल्पसंख्याक निधीतून शादीखान्याचे बांधकाम झालेले आहे. पूर्वीची बाजाराची जागा अरूंद व अपूर्ण पडत असल्याने बाजाराचे स्थलांतर करून प्रशस्त अशा ठिकाणी केले आहे.

विक्रेत्यांसाठी ओटे बांधले आहेत. फिरके वाडा व पाटीलवाडा येथे रस्त्याचे कॉक्रिटीकरण केले आहे . चौदाव्या वित्त योजनेतून शाळा व अंगणवाडीचे डिजीटलायझेशनचे काम लवकरच पूर्ण करणार आहे.

आरजू सरफराज तडवी, सरपंच, न्हावी ग्रामपंचायत

LEAVE A REPLY

*