असोदा पाणीपुरवठा योजना वेळेवर पूर्ण न झाल्यास अधिकार्‍यांवर कारवाई : ना. गुलाबराव पाटील

0
जळगाव |  प्रतिनिधी :  तालुक्यातील असोदा या गावाला भारत पेयजल योजनेतुन ४ कोटीची पाणी योजना मंजुर असुन ३ कोटी ८२ लाखा निधी वितरीत झाला आहे. पैसा वितरीत होवून देखील कामे होत नाही, उलट नागरीकांना पाणी मिळत नाही,

पैसा देवून ही पाणी योजना पुर्ण होत नसेल तर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असा ईशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीवेळी दिला.

जळगाव तालुका समन्वय समितीची बैठक ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठीकीला व्यासपीठावर जि.प सदस्य पवन सोनवणे,पंचायत समितीचे सदस्य नंदलाल पाटील,सरपंच डॉ.कमलाकर पाटील,तहसीलदार अमोल निकम,बिडीओ शंकुतला सोनवणे आदी उपस्थित होते.

या बैठकीत असोदा पाणी योजनेवरून अर्धातास अधिकार्‍यांना फैलावर घेत त्यांची कान उघडणी करण्यात आली. असोदा पाणी योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचा खुलासा अधिकार्‍यांनी केल्यानंतर ना.पाटील म्हणाले की,सभेत खोटे बोलु नका या योजनेची सर्व माहीती मला ठावूक आहे.

आठ दिवसापुर्वी काम सुरू केले आणि काम प्रगतीत आहे असे सांगु नका? खोटे बोलाल तर अडचणीत याल असे ना. पाटील यांनी सांगितले. असोदा योजनेचे काम किती महीन्यात पुर्ण होईल हे सांगा?

यावर अधिकार्‍यांनी तीन महिन्यात करू असे सांगितल्यावर पावसाळ्यात कसे काम करणार आहे ते स्पष्ट करा,गाव शांत आहे तो पर्यंत ठीक आहे अन्यथा तुम्हीला खुर्चीवर बसणे मुष्किल होईल,असा ईशारा ही त्यांनी दिला.

येत्या महिन्यापासुन पावसाळा सुरू आहे. या दोन महिन्यात आव्हाणेसह ज्या गावात दुषीत पाणी येते तेथे काळजी घ्या,पाण ायाचे नमुने घेवून त्या गावांना टीसीएलचा पुरवठा झाला पाहीजे असे ही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेच्या संबंधित अधिकार्‍यांनी टक्केवारी घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप

असोदा पाणी योजनांबाबत खेमचंद महाजन व किशोर चौधरी यांनी अधिकार्‍यांवर टक्केवारीचे आरोप केले. अधिकारी टक्केवारीने कमीशन घेतात आणि ठेकेदाराला झुकते माप देत आहे.

या योजनेबाबत श्वेतपत्रिका काढा अशी मागणी त्यांनी केली. तसेच या योजनेचे ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे सांगितले. यावेळी ना. पाटील यांनी शाखा अभियंत्याला ठेकेदाराबाबत विचारले असता. त्यांनी मुंडे नामक ठेकेदार असल्याचे सांगितले.

यावर ना. पाटील यांनी ठेकेदार तुमचा जावाई आहे का असे बोलत अधिकार्‍याला चांगलेच धारेवर धरले. कामे अन्यथा माझ्याशी गाठ असल्याचेही ते म्हणाले.

मोहाडी रूग्णालयासाठी ३ कोटी ५० लाखाचा निधी

जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे १०० खाटांचे सुसज्ज रूग्णालय मंजुर करण्यात आले असुन यासाठी ३ कोटी ५० लाखाचा निधी देखील मंजर झाला आहे.

या रूग्णालयाला आता टेक्नीकल मंजुरी बाकी असल्याचे ना.पाटील यांनी बैठकीवेळी सांगितले तसेच वाघनगर पाणी पुरवठा योजनेसाठी ५ कोटी रुपये मंजुर झाले असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले

महावितरणच्या दोन्ही अधिकार्‍यांची बदली करा

भादली सबस्टेशनवर कार्यरत असलेले एमएसईबीचे अहिरे व पवार हे शेतकर्‍यांंना फोनवर अरेरावी करतात,अशा तक्रारी आल्यानंतर आजच्या बैठकीत ना.पाटील यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली.

या दोघांची तात्काळ बदली करा असे आदेश ना.पाटील यांनी दिले. बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवू असे ही अधिकार्‍यांनी सांगितले.

१४ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाची माहिती द्या

तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळालेला १४ व्या वित्त आयोगाचा निधी व खर्च झालेला निधी याची माहीती सात दिवसात सादर करण्याचे आदेश ना.गुलाबराव पाटील यांनी दिले.

याबैठकीत ना.पाटील यांनी पाणीयोजना,वृक्ष लागवड,जलयुक्त शिवार,गोपीनाथ मुंडे अपघात योजना,रस्ते,हगणदारी मुक्त गावे,शौचालय,घरकुल यांचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*