पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करा – महापौर

0
धुळे |  प्रतिनिधी : शहरातील नाल्यांच्या आजूबाजूला असलेल्या अतिक्रमितधारकांना तसेच पडक्या घरात राहणार्‍या नागरीकांना नोटीस देण्यात याव्यात, तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी अशी सूचना महापौर सौ. कल्पना महाले यांनी केली.

शहरातील नालेसफाई व आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर सौ. महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील दाट वस्तीतील पाणी साचणार्‍या जागा, अरुंद नाले यांची माहिती घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांच्या अडचणी जाणवून घेवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.पावसाळ्यापुर्वी नालेसफाई करावी व आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी पथके नियुक्त करावीत अशा सूचना महापौरांनी दिल्यात.

पावसाळ्यात उद्भवणार्‍या स्थितीत कामचूकार करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापौरांनी दिला. पावसाळ्यापुर्वी शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजण्यात यावेत.

तसेच सुरु असलेल्या डांबरी रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्यात यावेत, कामात कामचुकार पणा करू नकार, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

बैठकीला महिला बालकल्याण सभापती सौ. इंदू वाघ, नगरसेवक चंद्रकांत सोनार, संदीप महाले, उपायुक्त रवींद्र जाधव, शहर अभियंता कैलास शिंदे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रत्नाकर माळी, कनिष्ठ अभियंता एस.बी.विसपुते, सहाय्यक अग्निशमन अधिकारी तुषार ढाके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*