बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सचे ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर १५ रोजी स्थलांतर

0
जळगाव |  प्रतिनिधी :  ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हॉकर्सला स्थलांतरीत करण्याबाबत महासभेने ठराव केला आहे. या ठरावानुसार बळीराम पेठ, सुभाषचौक, शिवाजी रोडवरील ७८२ हॉकर्ससाठी सोडत काढून जागा निश्‍चित करण्यात आली. सर्व हॉकर्सला दि.१५ रोजी प्रत्यक्ष जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांनी दिली.

ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर बळीरामपेठेतील ३८३, सुभाष चौक ३०९ आणि शिवाजीरोड ९० असे एकूण ७८२ हॉकर्सला स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

यामध्ये ४४४ भाजीपाला विक्रेते, १०२ फळ विक्रेते, ४० फुल विक्रेते व १९६ अन्य किरकोळ विक्रेते आहेत. दरम्यान, आज दुपारी ७८२ हॉकर्सची जागा निश्‍चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली.

यावेळी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, विजय देशमुख, आतिष राणा, संजय पाटील, सुनिल पवार, संजय परदेशी, साजिद अली आदी कर्मचारी उपस्थित होते.

सोडत द्वारे निश्‍चित करण्यात आलेल्या हॉकर्सला दि.१५ रोजी ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

अतिक्रमणाची कारवाई
टॉवर चौक, चित्रा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करण्यात आली.
यावेळी अतिक्रमण पथकाने चार हातगाड्या, टेबल, छत्री यासह साहित्य जप्त केले आहे. आतिष राणा, संजय परदेशी, संजय पाटील, नरेंद्र गायकवाड, सुधाकर वाणी, सुनिल धांडे, लक्ष्मी जावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*