बडगुजर समाजातील 70 गुणवंतांचा गौरव

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-बडगुजर विद्या प्रसारक मंडळाची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी विषय पत्रीकेवरील विविध विषयांवर चर्चा करुन ठरावांना मंजूरी देण्यात आली. दरम्यान, समाजातील 70 गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

बडगुजर विद्याप्रसारक मंडळाची सुरेश बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश बडगुजर, अविनाश बडगुजर, सुभाष बडगुजर, भिला गुरुजी, रंगराव बडगुजर, सी.वाय.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर समाजातील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

दरम्यान, सुरेश बडगुजर, भगवान मासमर्दाने यांनी पत्येकी 11 हजार, प्रभाकर बडगुजर यांनी 5 हजार तर नंदलाल पवार यांनी 1 हजार रुपयाची मंडळाला देणगी जाहीर केली. प्रास्ताविक हेमचंद्र बडगुजर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ.आशिष जाधव यांनी करुन दिला. सुत्रसंचलन प्रविण सुर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

*