जळगावात तरुणीवर अत्याचार

0
जळगाव । दि. 28 । प्रतिनिधी-पवन एक्सप्रेसने प्रवास करून जळगाव रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवासी 22 वर्षीय तरुणीला रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांनी रिक्षेत बसवून जुन्या निमखेडी रोडवरील माल धक्क्याजवळ नेवून तिच्यावर अत्याचा केल्याचा प्रकार आज उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.
नागरिकांच्या मदतीने या तरुणीला जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणण्यात आले. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठल्याही पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.

याबाबत पिडीत तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून, तरुणी अहमदबाद येथून रेल्वेने जळगावाला आली. त्यानंतर ती पुन्हा जळगाव येथून बरेली एक्सप्रेसने नाशिक येथे जाण्यास निघाली.

या ठिकाणी रेल्वे टिसीने या तिकीटाची विचारणा केली. तरुणीने नेहमी प्रवास करीत असल्याचे सांगितल्याने टीसीला एसीच्या डब्ब्यात घेवून गेला.

त्यानंतर मनमाड रेल्वे स्थानकावरच ती उतरली. व पवन एक्सप्रेसने पुन्हा जळगावकडे येण्यासाठी निघाली. यावेळी रेल्वेतील चहा विक्रेत्याशी तिची ओळख झाली. दोघे दि.27 रोजी रात्री 8 वाजता पवन एक्सप्रेसने जळगावला आले.

चहा विक्रेता करीम शेख याने तीला रेल्वे स्थानकावर सोडून तो निघून गेला. पाऊस थांबल्यानंतर या तरुणीने स्टेशनच्या बाहेरील अंडापावच्या गाडीवरून खाण्यास घेवून पाण्याची बाटली घेतली.

त्यानंतर ती रेल्वे स्टेशनजवळील शहर पोलिस चौकीजवळ उभी होती. त्यानंतर रिक्षा स्टॉपवर उभ्या असलेल्या रिक्षाचालक व त्याच्या सोबतच्या दोघांनी तिला रिक्षेत सोबत घेवून तिला निमखेडी रस्त्यावर रेल्वेच्या मालधक्क्याकडे नेवून तिच्यावर रात्रभर अतिप्रसंग करून तिलासोडून दिले.

सकाळी ती थकलेल्या अवस्थेत पायी रस्त्याने पिंप्राळा रेल्वेगेट मार्गे फॉरेस्ट कॉलनीजवळ आली. त्याठिकाणी नागरिकांनी तिच्याशी चर्चा केली असता, तिने आपबिती कथन केली. नागरिकांनी तिला जिल्हापेठ पोलिसात आणले.

या ठिकाणी तिने पोलिसांना माहिती दिली. डीवायएसपी सचिन सांगळे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड व डीबी पथकाला चौकशीच्या सुचना दिला. दरम्यान काहीशी घटना शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने डिवायएसपी सांगळे यांनी पोनि प्रदीप ठाकूर यांना देखील बोलविले.

रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ,शहर व तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनेचा तपास करून चौकशी करीत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

 

LEAVE A REPLY

*