सरकारी वकीलाला लाच मागणार्‍या न्यायालयीन लिपीकास एका वर्षाची शिक्षा

0
जळगाव । दि. 28 । प्रतिनिधी-वाढीव वेतनाच्या फरकाचे बील खात्यात जमा करून त्याच्या बदल्यात सरकारी वकीलाकडून लाच मागितल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हात न्यायालयाने न्यायालयीन लिपीकास दोषी ठरविले. त्याला एका वर्षाची शिक्षा व 5 हजार दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तत्कालीन भुसावळ रेल्वे न्यायालयाचे वकील सुभाष विश्वनाथ कासार याच्या वाढीव वेतनाला दि.1 जानेवारी 1996 मध्ये मंजुरी मिळाली होती.

फरक मिळण्यासाठी कासार यांनी सरकारी अभियोक्ता कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. त्यानुषंगाने त्यांना मंजुर फरकाचे बिल मिळाले.

त्या बद्दल्यात सरकारी अभियोक्ता कार्यालयातील लिपीक सुरेश लक्ष्मण वाणी यांनी दि.15 मे 2014 रोजी सुभाष कासार यांना फोन करून तुमचे काम झाले आहे.

फरकाचे बिल खात्यात जमा केले आहे. ठरल्याप्रमाणे घेवून या असे सांगून 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत कासार यांनी दि.16 मे 2014 रोजी अ‍ॅन्टी तक्रार दिली.

या तक्रारीची पडताळणी पंचनामा होवून त्याच दिवशी जुन्या बी.जे मार्केटजवळ असलेल्या बाबा टी स्टॉल जवळ सुभाष कासार यांच्याकडून 6 हजार 500 रुपयांची लाच स्विकारतांना सुरेश वाणी यांना रंगेहाथ अटक करण्यात येवून त्यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौघांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
लाच मागितल्याप्रकरणी सुरेश वाणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या खटल्याप्रकरणी न्यायालयाने तक्रारदार सुभाष कासार, पडताळणी पंच विराज कर्डक, खटल्या चालविण्यास मंजुरी देणारे सक्षम अधिकारी के.पी.जोशी, तत्कालीन तपासाधिकारी पोनि. अनिल शिंदे यांच्या साक्षी व पुरावा गाह्य धरून न्यायालयाने लाचखोर लिपीक सुरेश वाणी यांना दोषी ठरविले.

अशी सुनावली शिक्षा
न्यायालयाचे न्या. पी.व्ही लाडेकर यांनी लाचखोर लिपीक सुरेश वाणी यांना दोषी ठरवून लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 खाली 1 वर्ष शिक्षा व 5 हजार रुपये दंड तर कलम 13 खाली 1 वर्ष शिक्षा व 5 हजार रुपये व दंड न भरल्यास 3 महिन्याची साधी शिक्षा सुनावली आहे.

दंडातील रक्कम तक्रारदार सुभाष कासार यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी असे आदेश दिले. सरकारपक्षातर्फ अ‍ॅड. मोहन देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.

 

LEAVE A REPLY

*