एमआयडीसीत गव्हाचा ट्रक उलटला ; चालक जखमी

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-एमआयडीसीतील इ-सेक्टरजवळील एका कंपनीजवळ गव्हाचा ट्रक उलटल्याने चालकासह क्लिनर जखमी झाल्याची घटना दि.27 रोजी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उज्जैनवरून गव्हाचे पोते भरलेला ट्रक काल रात्री दि.27 रोजी एमआयडीसीतील एका कंपनीजवळ आला.
याठिकाणी चालकाने कंपनीच्या बाहेर ट्रक क्रमांक एमपी 09 एचजी 6590 उभा केला. त्यानंतर चालक मनोहर चौधरी व चालक विनोद चौधरी हे ट्रकमध्येच झोपले.

यावेळी ट्रक कंपनीबाहेरील उतारावर लावलेला असल्याने ट्रक अचानक सुरु होवून जवळच असलेल्या कंपनीच्या लगत खोलवर जागेत रात्री 8.45 वाजेच्या सुमारास उलटला. यावेळी चालक व क्लिनर ट्रकमध्येच अडकले.

यावेळी नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घटना कळविली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रकची काच फोडून चालक व क्लिनर याला बाहेर काढले.

यात चालक मनोहर चौधरी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्यात आलेला नव्हता.

LEAVE A REPLY

*