उंटावद येथील तरूण शेतक-याची आत्महत्या : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय

0
उंटावद ता.यावल । वार्ताहर :  येथील तरूण शेतकरी संतोष जगतराव पवार (वय ५४) यांनी दि.११ रोजी सायंकाळी कर्ज बाजारी पणाला कंटाळुन विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली.

संतोष पवार यांच्या शेतात बिजासन मातेचे मंदीर आहे. मंदीराच्या स्थापनेपासून संतोष पवार हे सकाळ व सायंकाळ मातेची आरती करण्यासाठी शेतातील मंदीरावर जात असत.

दि.११ रोजी देखील पवार हे सायंकाळी ६ वाजता मातेच्या आरतीसाठी शेतात गेले. मात्र त्यांनी सोबत मोबाईल व मोटारसायकल न नेता पायी चालत शेतात गेले .

मात्र  रात्रीचे ८.३० वाजले तरी संतोष पवार हे घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी पवार यांना बोलावण्यासाठी शेतात पाठवले मात्र संतोष पवार हे बिजासन मातेच्या मंदीराच्या ओट्यावर मृत अवस्थेत पडलेले दिसले.

त्यांच्या जवळच मोनोसील या विषारी औषधाची बाटलीही होती. ही वार्ता गावात वा-यासारखी पसरली व गावक-यांनी पवार यांना पाहण्या साठी एकच गर्दी केली.

संतोष जगतराव पवार यांनी आपल्या स्वकष्टाने दोन बिघे शेत  घेतले होते व त्यात ट्युबवेल करूण पाण्याची सोय केली होती व बागायत शेती ते करत होते मात्र निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे त्यांना अपेक्षीत असे उत्पंन्न मिळत नसल्याने सरकारी पीककर्जाचीही ते परतफेड करू शकत नव्हते व इतरही कर्ज त्यांच्यावर होते .

तसेच तिन महिण्यांपुर्वी मुलीचे लग्न त्यांनी केले असल्याने त्यासाठी देखील पैशांची उचल त्यांनी केली होती.त्यामुळे ते नेहमी विचारात रहात .

तश्यातच दि.७ रोजी सायंकाळी उंटावदसह परीसरात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडल्याने व पवार यांनी केळी लावलेली होती. त्यांना असे वाटले असावे की यावर्षी देखील निसर्ग आपल्याला साथ देणार नाही व आपण घेतलेले कर्ज परतफेड करू शकनार नाही व याच विचारात त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे.

संतोष पवार यांच्या पश्चात पत्नि,एक मुलगा व एक मुलगी (विवाहीत) असा परीवार आहे. या घटनेची माहीती पोलीस पाटील सुरेश माधवराव पाटील यांनी यावलचे पो.नि.बळीराम हीरे यांना दिली  व नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल येथे नेण्यात आला .तपास ए.पी.आय.तांदळे करत आहेत.

मात्र रात्री शवविच्छेदनासाठी पाठवलेल्या मृतदेहाचे शव विच्छेदन  यावलच्या ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी डाँक्टर नसल्याने दुस-या दिवशी दुपारी १ वाजता शव विच्छेदन करूण मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात उंटावद येथे संतोष पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*