जि.प.मधील वर्ग-3 च्या पदासाठी ऑनलाईन भरती प्रकिया

0
जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेमधील वर्ग-3 च्या पदासाठी ऑनलाईन परिक्षा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील वर्ग-3 ची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाल निवड समिती गठीत करण्यात येत असायची.

या समितीत जिल्हाधिकारी, सीईओ व इतर जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचा बर्‍याच प्रमाणात वेळ व श्रमाचा अपव्यय होतो. याचा कामावर विपरीत परिणाम कामावर होत असल्याने जिल्हा परिषदेतील वर्ग-3 च्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

नियुक्तीसाठी पात्र ठरलेले उमेदवारांची त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे व गुणानुसार जिल्हानिहाय नियुक्तीची प्रथम यादी घोषित करण्यात येईल. त्यानंतर ऑनलाईन परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार तसेच त्यांनी दिलेल्या प्राधान्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियुक्ती प्रधिकारी म्हणून नियुक्ती देतील. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे भरती प्रकियेत अधिक पारदर्शकता येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*