रोजगारासाठी पात्रतेसोबत कौशल्य आवश्यक

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-शिक्षण घेऊन आपण फक्त पात्रता मिळवीत असतो. परंतू रोजगारासाठी पात्रतेसोबत इतर कौशल्य विकसित असणे अत्यंत महत्वाचे आहे. असे मत जॉन डीअर कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिजीत परलीकर यांनी व्यक्त केले.
जी.एच.रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित महा रोजगार मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, प्लेसमेंट डीन, विजय कपाई, आनंद कामटीकर व कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक उपस्थित होते.

पुढे बोलताना अभिजीत परलीकर म्हणाले की, रोजगार उपलब्ध होणे तितकेच सोपे व कठीणही आहे. रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक त्या सुप्त गुणांना विकसित करणे महत्त्वाचे आहे.

तसेच विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य, वर्तणूक, शिस्तबद्धपणा, सादरीकरण, क्षमता अशा विविध गुणांच्या उणीवा भरून काढणे म्हणजे तुमचा रोजगाराचा मार्ग खुला झाला असे म्हणता येईल. असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ.प्रभाकर भट व संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी 658 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.

त्यापैकी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तब्बल 112 विद्यार्थ्यांची निवड झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.

यशस्वितेसाठी प्लेसमेंट अधिकारी निलेश बाऊस्कर, पंकज पाटील, प्रा.तन्मय भाले व विद्यार्थी समन्वयक यांनी काम पहिले.

 

LEAVE A REPLY

*