मलकापूरला तिहेरी अपघातात १३ जखमी

0
मलकापूर |  प्रतिनिधी :   येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मौजे वाघुडनजीक कन्हैया ढाब्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातात १३ जण जखमी झाल्याची घटना दि. ११ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. त्यात एका इसमाची प्रकृती चिंताजनक असुन त्यांना जळगाव खान्देश येेथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, ऑटो क्र. एमएच २८ टी ८७८ वाघुडकडून मलकापूरकडे येत होती. तिच्या मागोमाग हिरोहोंडा दुचाकी होती विरूध्द दिशेने येणारी इनोव्हा क्र. एमएच १८ व्ही २५२ या गाडी चालकाचा वाहनावरील तोल सुटल्याने तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली.

त्यातून तिहेरी अपघात घडला. या अपघातात ऑटोचालक गजानन जगदेव काटकर (वय ५०) यांच्या पोटात ऑटोचे स्टेअरींग घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जळगाव खान्देश येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या अपघातात आशाबाई कडु गुलेकर (वय ४०), शोभा भगवान गुंजाळ (वय ३२), सुरेखा आत्माराम घुले (वय ३०), विनायक आत्माराम घुले (वय १८), मंगला गायकवाड (वय ४०), वसंत साबळे (वय २५), कृष्णा चौधरी (वय २९), संतोष गजानन गुंजकर (वय १५), वैष्णवी गजानन गुंजकर, संगिता गजानन गुंजकर (वय ४०), अनिल विनायक दांडगे (वय ४०) असे१२ जण जखमी झाले आहेत.

यांच्यावर चोपडे हॉस्पीटल मलकापूर येथे उपचार सुरू आहेत. घटनेची वार्ता कळताच नगराध्यक्ष ऍड.हरिष रावळ, भाराकॉंंचे गजानन ठोसर, पत्रकार संदीप गावडे आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तात्काळ उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले. घटनेचा तपास व पुढील कारवाई पोलिस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू करित आहे.

LEAVE A REPLY

*