मद्यविक्रीचा मार्ग मोकळा

0
जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-मनपासह नगरपालिका, नगरपरीषद, नगरपंचायत क्षेत्रात आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाच्या 500 मिटरच्या आत मद्य विक्रीला बंदी घातली होती. या बंदीमुळे महामार्गालगतची हॉटेल, बियरबार, वाईनशॉप यांच्यावर संक्रांत आली होती.

दरम्यान राज्यातही हा निर्णय लागू झाल्याने मद्यविक्री व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. दरम्यान यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात चंदीगढच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नव्याने आदेश पारीत केले आहे.

यात मनपा, नगरपालिका, नगरपरीषद, नगरपंचायत, या क्षेत्रात मद्यविक्री बंदी लागु राहणार नसल्याचा निकाल दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅड. प्रशांत केंजळे यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली. या निकालामुळे शहरासह परीसरात आता मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*