मेहरुण परिसरात घरफोडी

0
जळगाव । दि.23 । प्रतिनिधी – मुंबई येथे मुलीकडे गेेल्याची संधी साधत चोरट्यांनी मेहरुण परिसारातील गणेशपुरी येथील बंद घरात चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली.
यात 53 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेहरुण परिसातील गणेशपुरी भागात नफिसा देशमुखा या वास्तव्यास असून त्या गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई येथे राहत असलेल्या रुही देशमुख यांना भेटण्यासाठी गेल्या आहेत.

तसेच मुन्नीबी महमंद शरीफ ही महिला त्यांच्या देशमुख यांच्या घराची साफसफाई करण्यात येत असते. त्यामुळे घरी कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील दागिने व रोकड असा एकूण 53 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला.

दरम्यान, नफिसा देशमुख यांना कुरीयर देण्यासाठी कुरीयरवाला आज सकाळी त्यांच्या घरी आल्याने शेजारी राहणार्‍या सुलोचना देशमुख पाटील यांनी नफिसा देशमुख यांना फोन करुन घरी आले का अशी विचारणा करीत कुरीयर वाला असल्याचे सांगीतले.

यावर देशमुख यांनी मी घरी नसल्याचे सांगीतल्यानंतर तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती सुलोचना पाटील यांनी त्यांना दिली. त्यानंतर सुलोचना पाटील यांनी हाजी शेख अशरफ शेख शौकत यांनी बोलवूनल घराची तपासणी केली.

त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी नफिसा देशमुख यांना फोन करुन चोरी झाल्याची माहिती दिली. दरम्यान, देशमुख यांनी अ‍ॅड. रहिम मोहंमद पिंजारी यांना घरी जावून पाहणी करण्याचे सांगीतले.

यावर अ‍ॅड. रहिम मोहंमद पिंजारी यांनी देशमुख यांच्या घराची पाहणी केली असता. त्यांना घराचा कडीकोयंडा तोडून कपातील दागीने व लंपास केल्याचे दिसून आले.

त्यानंतर अ‍ॅड. पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाच चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी लंपास केला असा मुद्देमाल
घरातील लाकडी कपाट फोडून त्यातील 50 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या 10 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या, 3 ग्रॅम वजनाचे टॉप्स तसेच 2 हजार रूपयांची रोकड व 1 हजार 600 रूपयांची चिल्लर असे एकूण 53 हजार 600 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

 

LEAVE A REPLY

*