टिसीएलचे फोर-के स्मार्ट टिव्ही

0
इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत दररोज नवनविन वस्तूंचे उत्पादन करुन त्या बाजारपेठेत दाखल होत असतात. यामध्ये टिसीएल कंपनीने भारतीय बाजारपेठेत सी२ आणि पी२ एम हे दोन फोर-के युएचडी क्षमतेचे स्मार्ट टिव्ही बाजारात दाखल केले आहे.

बाजापेठेत दाखल झालेल्या या स्मार्ट टिव्हींमध्ये टिसीएल सी२ हे मॉडेलचे आकारमान हे ६५ इंची आहे. तर टिसीएल पी २ एम या मॉडेलचा आकारमान हा ५५ आणि ६५ इंच या दोन आकारमानात व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे.

दाखल करण्यात आलेल्या या दोन स्मार्ट टिव्हींमध्ये ३८४० बाय २१६० पिक्सल्स म्हणजेच अल्ट्रा हाय डेफिनेशनचा एलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये १.५ गेगाहर्टझ् क्वॉड-कोअर ए-५३ प्रोसेसर देखील प्रदान करण्यात आले आहे. या स्मार्ट टिव्हींची रॅम ही २.५ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतकी आहे.

बाजारपेठेत आलेले हे सर्व स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहेत. यामध्ये देण्यात आलेल्या विविध फंक्शन्सच्या कार्यान्वयनासाठी मोशन कंट्रोल रिमोट देण्यात आला असून यामध्ये व्हाईस कमांडची व्यवस्था दिली आहे.

तसेच या टिव्हींमध्ये गुगलचे क्रोमकास्ट हे उपकरण इनबिल्ट स्वरुपात देण्यात आले असून याच्या मदतीने स्मार्टफोनवरील कंटेंट टिव्हीवर देखील बघता येणार आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरून विविध ऍप्स डाऊनलोड करून ते या टिव्हीवर बघता येणार आहे. यामध्ये अतिशय उत्कृष्ट दजाची हर्मन कार्दोन ही ध्वनी प्रणाली प्रदान करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*