कन्नड घाटात रस्ता खचला : वाहतूक मार्गात बदल

0
जळगाव । दि.21। प्रतिनिधी-राष्ट्रीय महामार्ग क्र.211 धुळे-सोलापूर या मार्गावरील कन्नड ते चाळीसगाव दरम्यान कन्नडच्या घाटातील रस्ता दरीकडे खचल्याने वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असल्याचे जिल्हा वाहतुक शाखेतर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्याने कन्नड घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अपघात होवून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 211 धुळे-सोलापूर या मार्गावरील कन्नड घाटातील रस्ता दरीकडे खचल्याची घटना घडली आहे.

मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. कुठलीही दुर्घटना होवु नये यासाठी महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली असून दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबत जिल्हा वाहतुक शाखेने राज्य परिवहन विभागाला देखील कळविले आहे.

असा आहे पर्यायी रस्ता
धुळेकडून औरंगाबादकडे जाणारी वाहतुक – धुळे-मेहुणबारे-चाळीसगाव बासपास – खडकी, बायपास हिरापुर, तळेगाव, नांदगाव बायपास, वैजापूरमार्गे औरंगाबाद.

औरंगाबादकडून धुळेकडे जाणार वाहतुक – औरंगाबाद, वैजापूर, नांदगाव बासपाय, तळेगाव, हिरापूर, खडकी बासपास, चाळीसगाव, मेहुरणबारे, धुळे.

धुळेकडून औरंगाबादकडे जाणारी वाहतुक – धुळे, पारोळा, एरंडोल, म्हसावद, नेरी, पहूर, सिल्लोडमार्गे औरंगाबाद.
औरंगाबादकडून धुळेकडे जाणारी वाहतुक – औरंगाबाद, सिल्लोड, पहूर, नेरी, म्हसावद, एरंडोल, पारोळा, धुळे या मार्गाने वळविण्यात आली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*