जिल्हा परिषदेच्या 331 रिक्त जागांसाठी लवकरच भरती

0
जळगाव । दि. 21 । प्रतिनिधी-मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षापासून भरती प्रकिया झालेली नाही. जळगाव जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षापासून 22 संवर्गातील 331 पदे रिक्त आहे.
या रिक्त पदांची शासनाने माहिती मागविली होती. जिल्हा परिषदेने दि.12 रोजी रिक्त पदांची माहिती शासनाला कळविली.
या अनुषंगाने आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी रिक्त जागांचा आढावा घेतला. याबैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आठवडयाभरात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षापासून कर्मचार्‍यांची भरती झालेली नसल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांवर रिक्त पदाचा अतिरिक्त भार आहे.

त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना अनेकदा अडचणी येतात. गेल्या दोन वर्षापासून विविध 22 संवर्गातील 331 पदे रिक्त असल्याने तसेच राज्यातील अनेक जिल्हा परिषदेत देखील पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायत विभागाने सर्वच जिल्हा परिषदांकडून रिक्त जागांची माहिती मागविली होती.

त्या अनुषंगाने बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीत शासनाने भरतीबाबत निकष ठरवून दिले असून येत्या नोव्हेंबर महिन्यात भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या रिक्त पदांची होणार भरती
जिल्हा परिषदेत एकूण 24 संवर्गापैकी कनिष्ठ सहाय्यक लेखा व कनिष्ठ सहाय्यक लिपिक हे पदे वगळून उर्वरीत 22 संवर्गातील 331 रिक्त पदे आहेत़ यात औषध निर्माण अधिकारी, वरीष्ठ सहाय्यक लेखा, कृषि अधिकारी, आरोग्य सेवक पुरूष व महिला, कनिष्ठ आरेखक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषि विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिक्षण विस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, लघुलेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियांत्रिकी या संवर्गामधील रिक्त पदे भरली जाणार आहेत़

 

 

LEAVE A REPLY

*