चाळीसगाव नगर पालिकेचे प्लॉस्टिकमुक्त अभियान नावालाच !

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  चाळीसगाव येथे मागील महिन्यात (दि ३० जुर्ले) मोठा गाजा वाजा करुन, नगरपरिषदेच्यावतीने प्लॉस्टिकमुक्त शहर अभिनयानाच्या शुभारंभ करण्यात आला. तसेच १५ ऑगस्ट नतंर चाळीसगावात प्लॅस्टिकवर पूर्णता; बंदी आणणार असल्याचे आमदार व मुख्याधिकारी यांनी भर सभेत सांगीतले होते. परंतू सद्यातरी अभियानाचा शुभारंभ झाल्यापासून, गेल्या २० दिवसांपासून प्लास्टिकमुक्त अभियान हे नावालाच दिसून येत आहे.

आतापर्यंत न.पा.कडून प्लॅस्टिक पिशव्या विक्रेते व प्लॅस्टिक होडिर्ंगवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे दिसून येत असून हे अभियान फक्त नावालाच सुरु करण्यात आल्याचे दिसत आहे.

चाळीसगाव नगरपरिषदेच्यावतीने अभिनेता सयाजी शिंदे, आमदार उन्मेष पाटील, अभियानाचे ब्रँड एम्बेसिडर महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, जि.प.सभापती पोपटतात्या भोळे, नगराध्यक्षा आशालता विश्‍वास चव्हाण, प.स.च्या सभापती स्मितल दिनेश बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील, न.पा.चे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, न.पा.चे आरोग्य सभापती घृष्णेश्‍वर पाटील, प्रातांधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे आदि मान्यवरांच्या उपस्थित प्लॉस्टिकमुक्त शहर अभिनयानाच्या शुभारंभ केला.

यावेळी आमदार उन्मेष पाटील व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी भर सभेत सांगीतले होते की, प्लॅस्टिकमुक्त अभियास आजपासून सुरुवात झाली असून येणार्‍या १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक शाळेत तसेच इतर ठिकाणी प्लॅस्टिकमुक्तीसाठी २०० हून आधिक स्वच्छतादूत शहरवासींयाचे प्रबोधन व प्लॅस्टिकमुक्त अभियानासाठी आवाहन करणार आहेत. तसेच १५ ऑगस्ट नतंर ५० मॅक्रोपेक्षा जास्त जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घालणार आहे.

परंतू आता अभियानास सुरुवात होऊन तब्बल २० दिवस झाले परंतू प्लॅस्टिकमुक्त अभियानासाठी नगर परिषदेकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहे. तसेच १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक शाळेत तसेच इतर ठिकाणी प्लॅस्टिकमुक्तीसाठी २०० हून आधिक स्वच्छतादूत शहरवासींयाचे प्रबोधन व प्लॅस्टिकमुक्तसाठी आवाहन व जगजागृती करतील असे सांगण्यात आले होते, अशी कुठल्याही प्रकारची जगजागृती होताना सद्यातरी दिसत नाही आहे.

त्यामुळे न.पा.कडून सुरु करण्यात आलेल्या ह्या अभियाबाबत नागरिकांडून शंका उपस्थित केली जात आहे. किवा प्लॅस्टिक पिशवी विक्रेतांवर किवा वापरणार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत होताना दिसत नाही आहे.

दहिहंडी उत्सवात प्लॅस्टिकचे होर्डिंगस

शहरात नुकताच मोठ्या उत्साहात न.पा.च्या सत्ताधार्‍यासह इतरांनी मोठ्या दहिहंडी उत्सव साजरा केला. दहिहंडी उत्सवाल शुभेच्छा देण्यासाठी शहरभर सर्वांनी मोठ- मोठाली प्लॅस्टिकचे होर्डिंगस लावले होते. जवळपास ५० जवळपास होर्डिंगस सर्व मिळुन लावले असतील.

परंतू ह्या एकाही होर्डिंगची न.पा.कडून परवागी घेण्यात आली नसल्याचे माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच हे सर्व होर्डिंगस प्लॅस्टिकपासून बनलेले असल्याने पर्यावरणास अतिशय घातक असल्याचे तज्ञाचे म्हणने आहे. प्लॅस्टिकमुक्त अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी आमदारांसह जे मान्यवर उपस्थित होते. त्यांचे फोटो जास्त करुन, शहरभर लागलेल्या प्लॅस्टिक होर्डिंगसवर दिसून येत होते. याचा अर्थ असा होतो की, कुपणच शेत खात आहे.

त्यामुळे हे अभियान कितपत यशस्वी होणार आहे, हे आता येणार्‍या काळात दिसणाराच आहे. न्यायालयाचे होर्डिंगस बंदीबाबतचे निर्देश असतानाही शहरातील मुख्य चौकात तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंगस लावले जाते. न.पा.कडून परवागी न घेता लावलेल्या होर्डिंग कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्यामुळे शहरात अनेक चर्चाना ऊत आला आहे. तसेच नगर परिषदेच्या कारभाराविरोध्दात संताप व्यक्त केला जात आहे.

प्लॅस्टिक पिशवीची सर्रास विक्री

शहरातील भाजी विक्रेतापासून ते मोठ्या दुकानांमध्ये सर्रास पणे ५० मक्रो पेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिक कॅरी बॅक विक्री केल्या जात आहे. तसेच पर्यावरणास हानीकारक असलेले प्लॅस्टिकचे होर्डींग, जेवनाच्या प्लॅस्टिकच्या पत्तरवाळ्या, चहाचे कप व इतर बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू सर्रास पणे विक्री होताना दिसत आहे.

मात्र न.पा.कडून शहरात कुठल्याही प्रकारची जगजागृती किवा त्यासाठी नागरिकांना आवाहान करण्यांसाठी होर्डिग लावलेले दिसत नाही आहे. त्यामुळे प्लॅस्टिक मुक्त अभियानाचा शुभारंभ तर झाला परंतू अभियानाचा उद्देश मात्र साद्य होताना दिसत नाही. तसेच त्यादृष्टीने न.पा.चे प्रयत्नही अपूर्ण पडत आहेत.

कडक करवाई

प्लॅस्टिक मुक्त चाळीसगाव करण्यासाठी लवकरच कडक पाऊले उंचल्यात येणार आहे. तसेच त्यासंदर्भात आम्ही बैठकीचे देखील आयोजन केले आहे.
अनिकेत मानोरकर (मुख्याधिकारी न.पा.चाळीसगाव)

ईव्हेंन्टचे स्वरुप, कृती शुन्य-
सत्ताधारी हे सद्या प्रत्येक गोष्टीला ईव्हेंन्टचे स्वरुप देत आहेत, परंतू प्रत्येक्षात कृती मात्र शून्य आहे. फक्त आम्ही काही तरी करतो आहे. हे गाजा वाजा करण्यासाठी असले उद्योग ते करत असतात, प्लॅस्टिकमुक्त अभियान त्याचच एक भाग आहे.
राजीव देशमुख (गटनेते-शहवि आघाडी)
कापडी पिशाव्याचे वाटप करणार
प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानासाठी लवकरच प्रत्येक घरी, कापडी पिशाव्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबाबतची जगजागृती देखील केली जाणार आहे. तसेच नागरिकांना प्लॅस्टिक मुक्त शहर करण्यासाठी कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
घृष्णेश्‍वर पाटील (आरोग्य सभापती भाजपा)

LEAVE A REPLY

*