चाळीसगाव बसस्थानक कॉंक्रिटीकरणाचा प्रश्न अनिर्णितच : आमदारांनी फोडले परिवहन मंत्र्यांच्या कार्यायावर खापर

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  चाळीसगाव बस स्थानकाचा कॉंक्रीटीकरणाचा प्रश्‍न गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबीत आहे.

बस स्थानकाच्या कॉंक्रीटीकरणांसाठी अनेक संघटनांनी आदोलन केलीत, तसेच आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मागील आठ महिन्यांपूर्वी कॉंक्रीटीकरणासाठी जवळपास १ कोटी रुपये मंजूर झाले.

परंतू परिवहन मंत्री यांच्या कार्यालयातील गलथानपणामुळे अजुनही कॉंक्रिटीकरणाचे भिजत घोगडे पडलेले आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळ्यातही प्रवाश्यांना बसस्थानात होणार्‍या चिखलातूनच प्रवास करावा लागणार की काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. कॉंक्रिटीकरणाचे भिजत घोंगडे कशामुळे पडले आहे, यामगची अनेक कारणे असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

चाळीसगाव आगारासह इतर आगाराच्या १५० ते २०० बसेस रोज येथे ये-जा करतात. तर अगाराचे दररोजचे उत्पन्न हे ६ ते ७ लाखा पर्यंत आहे. प्रवाशांचा व बसेसची इतकी मोठी वर्दळ असलेल्या चाळीसगाव आगाराच्या कॉक्रीटीकरणाचा प्रश्‍न गेल्या ५० वर्षांपासून राजकिय उदासिनेमुळे प्रलंबित आहे.

इतर वेळेस बस स्थानकात धुळीचे साम्राज्य असते, तर पावासाळ्यात सर्वत्र चिखल होतो. चिखलातून मार्ग काढत प्रवाशांना बस पकडण्यासाठी धावफळ करावी लागते. तर बस चालकांना तारेवरची कसरत करत बस मागे-पुढे करत असतांना करावी लागते.

त्यापूर्वीही अनेक संघटनांनी आंदोलन केलीत तसेच निवदेनही दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून आमदारांनी पाठपुरावा केल्यामुळे बस स्थानकाच्या कॉंक्रीटीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मजुंर झाला आहे.

परंतू गेल्या आठ महिन्यांपासून मंजुर झालेल्या निधी तसाच पडुन असून कॉंक्रीटीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही.

यामागील अनेक कारणे सांगीतली जात आहे. परंतू सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाचा गलथानपणा सांगीतला जात आहे.

तर दुसरे कारण ठेकेदाराकडून मागण्यात येणारी टक्केवारी सांगीतली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून कॉंक्रीटीकरणांचे भिजत घोंगडे पडलेले आहे.

कॉंक्रीटीकरणा संबंधीत परिवहन कार्यालयाकडून निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतू दोनच निविदा आल्यामुळे टेन्डर झाले नाही.

आता काही दिवासांपूर्वीच पुन्हा निविदा काढण्यात आली होती. आणि तिची आता वर्कऑर्डरही निघाली असून येत्या पंधरा दिवसात कॉंक्रीटीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कॉक्रीटीकरणासाठी केलेल्या सततच्या पाठपुरव्यामुळे १ कोटी रुपय मजुंर झाले आहेत. परंतु परिवाहन मंत्र्यांच्या कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गेल्या आठ महिन्यांपासून कॉक्रीटीकरणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे.

त्यासंबंधी मी सहा स्मरण पत्रे परिवहन मंत्र्यांना दिली आहेत. तसेच स्वत: उपोषणाचा देखील ईशारा दिला होता. आता सततच्या पाठपुराव्यामुळे कॉक्रीटीकरणाच्या निविदाची प्रक्रिया पूर्ण झाली असून धुळे येथील सोनवणे नामक ठेकेदाराने कॉक्रीटीकरणाचे टेंन्डर घेतलेले आहे.

कामा संदर्भात वर्कऑर्डर सुध्दा झाली असून येत्या पंधरा दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे.

– आ.उन्मेष पाटील, चाळीसगाव.

LEAVE A REPLY

*