चोपडा विधानसभा जिंकून आणण्यासाठी संघटना मजबूत करा- आ.खडसे

0
चोपडा |  प्रतिनिधी :  जनसंघाची प्रचार धुरा स्वीकारून सर्वत्र विचार पोहचविण्यासाठी पं.दिनदयालजींनी प्रयत्न केले. अंत्यदोयसारखी समाजाच्या शेवटच्या माणसापर्यतचे योजनेचे विचार त्यांनी दिला.  तेव्हा आजचे दिवस आले असल्याचे मत आ. एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले.

एका दिवसात भाजपला ही सत्ता मिळाली नसून स्व.उत्तमराव पाटील यांच्यासह १९८९ पासून चोपडा विधानसभा मतदार संघात कार्यकर्ते राबत राहिले. तेव्हा आजचे दिवस आले असल्याचे मत आ. एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले.

सत्ताधार्‍यांची बाजू मांडण्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे. सत्ताधार्‍यांनी तीन वर्षात काहीच केले नाही का?रस्ते,सिंचन योजना,सबस्टेशन,गुळप्रकल्प,असे अनेक कामे केली आहेत.

घरापर्यंत पोहचून झालेली कामे घराघरांत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात आदिवासी,दलित जनतेसाठी अनेक योजना सरकारने केल्या. त्या त्यांच्या पर्यंत पोहचविल्या पाहिजेत.

योजनांचे दलाल संपविण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय मोदी व राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पारदर्शी कारभाराच्यासाठी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत.

पक्षविस्तारात गरिब,श्रीमंत,सर्वच प्रकारचे कार्यकर्ते जोडले गेले पाहिजे. विधानसभा निवडणूक जिंकून आणता आली पाहिजे.

चोपड्यातील बुथ बुथ सशक्त करा.असे आवाहन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी आवाहन केले.आंबेडकरांनी देशाला घटना दिली.त्यामुळे आरक्षण व्यक्तीस्वातंत्र्य मिळत आहे.

प.दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने पक्षविस्तार,सरकारांची उपलब्धी देण्याचे पक्षाने ठरविले.

पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे.पक्षाचे काम जनतेत पोहचवले पाहिजे म्हणून विस्तारक तयार करणे गरजेचे आहे.दुर्दैवाने दहा दिवसापूर्वी सांगितल्यानंतरही बुथ प्रमुखांपर्यत आपण पोहचू शकलो नाही अशी खंत माजी मंत्री खडसेंनी व्यक्त केली.

येथील भारतीय जनता पक्षाचे बुथ प्रमुखांचा मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाला दिपप्रज्वलन व भारतमाता तसेच पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आला.

स्वागत माजी मंत्री एकनाथराव खडसे घनःश्याम अग्रवाल, खा.रक्षाताइ खडसे यांचा जि.प.सदस्य उज्वला म्हाळके,जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांचा सत्कार प्रदीप पाटील,जिल्हा संघटन सचिव प्रा .सुनिल नेवे,माजी जि.प.सदस्य पी.सी.पाटील,जि.प.सदस्य रवींद्र पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,जिल्हा युवा मोर्चाध्यक्ष अमोल पाटील, चंद्रकांत धनगर,ताराबाई पाटील,शांताराम पाटील,डॅा.सुरेश बोरोले यांचा सत्कार  पंकज पाटील,धनंजय पाटील, पप्पू पाटील, राजू डाभे, प्रतिभा पाटील, नरेंद्र पाटील,डॅा.व्हीकी सनेर,तुषार पाठक  या पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला.

जि.प.सदस्य ज्योती पाटील, उज्ज्वला म्हाळके, गजेंद्र सोनवणे,पंस सभापती आत्माराम म्हाळके, तुषार भील,रामसिंग पवार, प्रतिभा पाटील, पल्लवी भील,नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, घनःश्याम अग्रवाल,यांचा सत्कार माजी मंत्री खडसे,खा.खडसे यांनी केला.

भाजप प्रवेश चुंचाळे वि.का.सोसायटी चेअरमन जितेंद्र चौधरी,माजी पंस सदस्य नामदेव बाविस्कर,कृउबा संचालक रवींद्र पाटील,डॅा.पांडुरंग सोनवणे,डॅा.संजय पाटील, रंजना मराठे,चहार्डी सरपंच दत्तात्रय पाटील,मालोदच्या ग्रा.पं.चे सर्व सदस्य,भील्ल समाज अध्यक्ष धोंडीराम गायकवाड, खडगाव ग्रा.प.सदस्य,प्रा.अरुण मराठे, रवींद्र मराठे,आदि सुमारे तीनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते भाजपत प्रवेश केला.

बुध्दांची प्रतिमा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आली.  प्रा.डॅा.सुनिल नेवे  यांनी सांगितले की  गौतम बुध्दांच्या विचाराने भाजप चालते.डॅा.आंबेडकर यांचे केवळ नांव नाही घेतले.

तर त्यांना यश दिले. पं.दिनदयाल उपाध्याय यांचे अंत्यदोय व एकात्मतेचा विचार घेवून आम्ही करीत आहेत.तालुक्यात दहा हजार भीम ऍप डाऊनलोड करणार असल्याची तयारी भाजयुमो कार्यकर्त्यांनी चालविली आहे.

उदय पाटील यांनी सांगितले की, भाजपत प्रवेश केल्यानंतर पश्चातापाची वेळ येणार नाही. भाजपाचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा माजी मंत्री,आजी माजी आमदार पक्षात येणार आहेत.

जिल्ह्यात अनेकांना भाजपचे डोहाळे लागले आहेत. गावागावातून घराघरातून केंद्र व राज्याच्या सरकारच्या योजना १८२ कार्यकर्ते घरोघर पोहचून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पक्षाचे सिध्दांत शेतकरी, कामकरी,जनतेला पर्यंत पोहचविले जाणार आहे.शिवाजी महारांजाच्या निती पोहचविण्याचे काम पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत.जिल्ह्यात ग्रामपंचायत ते दिल्ली पर्यंतचे यश नाथाभाऊंमुळे मिळाले.त्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.

सकाळीधानोरा येथे कॉक्रीटीकरण उदघाटन, अडावद येथे कॉंक्रीटीकरण भुमीपुजन, घुमावल बु॥ येथे डाबंरीकरन रस्त्याचे उदघाटन, आडगाव येथे सभामडंप भुमीपुजन खासदार रक्षाताईंच्या हस्ते पार पडले.

खा.रक्षा खडसे यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गावात आहेत. भाजप भारतीय संस्कृतीला धरून चालणार पक्ष आहे. लोकहितासाठी पक्षाची स्थापना झाली आहे.

प्रत्येक गावाच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. अनेक ठिकाणी आज विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन करण्याचे काम आज दिवसभर आपण केले.

भीम ऍपचा व्यक्तीगत ङ्गायदा आपणास होईल.शासनाने दिलेल्या योजना जनते पर्यंत पोहचविल्या गेल्या पाहिजेत.कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्माराम म्हाळके, जी.टी.पाटील यांनी केले.यावेळी डॅा.चंद्रकांत बारेला,शशीकांत पाटील, शशीकांत देवरे,रंजना नेवे,नरेंद्र पाटील, गुलाब कुरेशी,काझी,भरत पाटील,ए.डी.चौधरी,मगन बाविस्कर, रवींद्र पाटील, हिंमतराव पाटील, अनिल पाटील, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*