नेतृत्व ही निरंतर चालणारी प्रक्रिया : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील

0
जळगाव |  नेतृत्व ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीच्या या अभियानात विद्याथ्र्यांमधील नेतृत्व गुण अधिक विकसित होत असतात असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बुधवार, दि.16 ऑगस्ट पासून राष्ट्रीय सेवायोजनेचे राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्व विकास शिबिर सुरु झाले. या शिबिराचे उद्घाटन करताना कुलगुरु प्रा.पाटील बोलत होते.
यावेळी रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ.अतुल साळुंखे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी उपस्थित होते.राष्ट्रीय सेवायोजना उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि उमवि यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
  प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, आज समाजाला चांगले नेतृत्व करणाज्या व्यक्तींची खूप गरज आहे. नेतृत्व गुण विद्याथ्र्यांजवळ असले तर नियोजित ध्येयाकडे त्यांची वाटचाल होऊ शकते.
शिक्षण घेत असताना सामाजिक बांधिलकी आणि रचनात्मक कार्यात वाहून घेणे हे व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक आवश्यक आहे. नेतृत्वात चारित्र्य, विश्वसार्हता आणि संयमीपणा हे गुण आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
  डॉ.अतुल साळुखे म्हणाले की, या नेतृत्व विकास शिबिरात सर्व विद्याथ्र्यांना एकत्र आणून समाज परिवर्तनासाठी त्यांना सिध्द करणे आणि त्यांच्यात नेतृत्व  गुण निर्माण करणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.विद्याथ्र्यांनी आत्मविश्वासासोबत सकारात्मक भूमिका ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी विद्यार्थी विकास प्रभारी संचालक व रासेयोचे समन्वयक प्रा.एस.टी.इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.
शिबिराचे समन्वयक डॉ.अजय सुरवाडे यांनी आभार मानले. पाच दिवसीय या शिबिरात 24 विद्यापीठांचे 150 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*