स्वातंत्र्यदिनानिमित्त आज भरगच्च कार्यक्रम

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी – स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या शहरात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांमध्ये ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान शहरात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन 70 वा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

पोलीस कवायत मैदान
भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दि.15 रोजी सकाळी 9.5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात होणार आहे.

अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे. या मुख्य शासकीय समारंभास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, नागरीक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.

आर.आर.विद्यालय
जळगाव ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित भा.का.लाठी विद्यामंदिर, न्यु. इंग्लिश मिडीयम स्कुल, आर.आर.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित ध्वजारोहण समारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त 7.30 वाजता आर.आर.विद्यालयाच्या प्रांगणात होणार असून संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल.

याप्रसंगी एन.सी.सी., आर.एस.पी., स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांचा शपथविधी कार्यक्रम होईल. विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध हस्त लिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच शिशुविहारातील विद्यार्थ्यांची देशभक्त व क्रांतीकारकांच्या विविध वेशभूषा सादर होतील. तसेच तिनही शाळांची विविध राष्ट्रभक्तीपर गीते सादर होतील.

आर.बी.पाटील विद्यालय
स्वातंत्र्यदिनानिमित्त आर.बी.पाटील विद्यालयातर्फे सरदार वल्लभभाई पटेल सभागृह पटांगण येथे दि.15 रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार आहे. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित रहावे

गोदावरी फाउंडेशन
भारताच्या स्वातंत्रदिनानिमीत्त गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थामध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 7.30 वाजता गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रांगणात गोदावरी इंग्लीश मिडीयम स्कुल, गोदावरी आय एम आर, व गोदावरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*