रद्दीच्या बदल्यात नव्या वह्या संकल्पनेचा गौरव

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-येथील आनंद बिझनेस संस्थेला स्टार्ट-अप प्रोजेक्ट अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात आले असून संस्थेच्या गौरवात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निमित्त आनंद बिझनेसचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारत सरकारच्या सा.का.नि.501 (अ) या 17 फेब्रुवारी 2016च्या राजपत्र अधिसूचने अंतर्गत जळगावस्थित ‘आनंद बिझनेस’ या संस्थेला भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रमोशन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजने सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन क्रमांक ऊखझझ 6755 देऊन 2 ऑगस्ट 2017 रोजी मान्यता दिली आहे.
आनंद बिझनेसची ‘रद्दी द्या, नव्या कोर्‍या वह्या घ्या’ या पर्यावरणपूरक अभिनव संकल्पनेला राष्ट्रीयस्तरावर स्टार्ट-अप प्रोजेक्ट अंतर्गत कार्य करण्याची मान्यता दिली आहे.

या अंतर्गत जश्रर, नेारीें, चरज्ञशूीींळि आजपर्यंत संपूर्ण भारतातून 2011 पासून आत्तापर्यंत 2505 संकल्पनांना मान्यता मिळाली आहे.

आज संपूर्ण भारतामध्ये शाळा, कॉलेजेस, सरकारी व निमसरकारी कार्यालये, कार्पोरेट्स व घरगुती अशी लाखो टन रद्दी ही संकलीत झालेली असून यामुळे प्रदुषण व कचरा यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात घेऊन सदर रद्दीच्या पुनप्रक्रियेद्वारे निर्मित लगद्यातून 90 ब्राइटनेसच्या पांढर्‍या शुभ्र कागदाची निर्मिती करुन त्याच्या वह्या, रजिस्टर, अभ्यासाची पुस्तके, कॉपिअर (झेरॉक्स्) पेपर निर्मिती करण्याचा आनंद बिझनेसच्या या संकल्पनेला याअगोदरच कॉपिराईट प्राप्त झालेले आहेत.

प्रायोगिक तत्वावर दोन वर्षांपूर्वी हा प्रयोग पुणे येथे राबविण्यात आला. अभुतपूर्व प्रतिसादानंतर याचा विस्तार रोजगार निर्मिती, सर्वसामान्यांना शिक्षणासाठी प्रेरणा, पर्यावरणाचे रक्षण, कचरा व्यवस्थापन आणि हे सर्व करतांना फ्रँचायझी मॉड्युलच्या माध्यमातून पहिल्या प्रायोगिक टप्प्यात खान्देशमध्ये 34 लोकांना मानक स्वरुपात रोजगार उपलब्ध करुन दिला.

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तापासून प्रथम चरणात संपूर्ण महाराष्ट्रात 1600 लोकांना फ्रँचायझी व सबफ्रँचायझी बनवून सुमारे 10 हजार लोकांना रोजगाराची निर्मिती करण्यात येणार आहे.

या टप्प्यात महाराष्ट्रात सुमारे 11 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून यामुळे ठिकठिकाणी गोळा झालेला सुमारे 15 हजार टन कागदरुपी कचरा संकलित होऊन स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही मोहीम प्रभावीपणे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा संकल्प आनंद बिझनेसचे संचालक आनंद जितेंद्र कोठारी यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला.

तसेच महाराष्ट्र हे भारतातील पहिले रद्दीमुक्त राज्य करण्याचा संकल्प घेवून येत्या वर्षभरात किमान 5 हजार लोकवस्ती असलेल्या प्रत्येक गावामध्ये पोहचविण्यासाठी या स्टार्ट-अप महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रात आजपर्यंत मोठे कार्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासोबतच रिसायकल पेपरवर जैनसोलरद्वारे निर्मित ‘विजेवर छपाईचे काम लवकर होणार आहे.’ स्वातंत्र्यदिनी पूर्णपणे कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘रद्दी द्या, नव्या कोर्‍या वह्या घ्या’ या अभिनव संकल्पनेत कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठ्याप्रमाणात प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आनंदी जितेंद्र कोठारी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*