नाट्यशास्त्रीय कार्यशाळेत डॉ.ब्रजवल्लभ मिश्रा यांनी दिले अभिनयाचे धडे

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी – कल्पतरु बहुउद्देशिय संस्थेतर्फे तीन दिवसीय नाट्यशास्त्रीय कार्यशाळेत संगीत नृत्यतज्ञ डॉ.ब्रजवल्लभ मिश्रा यांनी अभिनयाचे धडे दिले.

माता सरस्वती व नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.ब्रजवल्लभ मिश्रा, डॉ.अंशूमन मिश्रा, प्रकाश कोठारी, सुनिल पांडे, योगेश हिवरकर, नंदकिशोर पांडे उपस्थित होते.

डॉ.ब्रजवल्लभ मिश्रा यांनी नाट्यशास्त्राच्या रचनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच अभिनयाच्या प्रकारामध्ये भाव आणि रस याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितींना मार्गदर्शन केले.

उद्या दि.13 रोजी नाट्यतत्वांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*