युवा दिनी एड्स निर्मुलनासाठी जनजागृती

0

जळगाव । दि.12 । प्रतिनिधी – जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय जळगावच्या वतीने युवादिनानिमित्त एड्स निर्मुलनासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच नुतन मराठा महाविद्यालयात शिक्षकांसह विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.

एड्स निर्मुलनासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. युवादिनानिमित्त नुतन मराठा महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी केले. यावेळी प्राचार्य एल.पी.देशमुख, उपप्राचार्य श्री.पवार, महोज्जीम खान, गिरीष गडे यांच्यासह नुतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापकवृंद व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*